एकनाथ शिंदेंविरोधात नेमकं काय शिजतंय?, भाजपकडं बोट करून कदमांचं खळबळजनक वक्तव्य

Ramdas Kadam : ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राचं राजकारण तापलं असतानाच ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी गंभीर आरोप केले आहेत.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 23T150500.281

Ramdas Kadam on Jarange Audio Clip : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक कथित ऑडिओ क्लिप ऐकवली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं. या क्लिपमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना देण्यासाठी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतल्याचा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून ही रक्कम दिल्याचा दावा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर शिवसेनेच्या शिंदे गटानेही आक्रमक भूमिका घेतली असून, नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांच्यासह भाजपवर निशाणा साधला.

एकनाथ शिंदे यांना संपवण्याचा प्रयत्न नेमका कोण करत आहे, असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपवर मोठा विश्वास ठेवून त्यांच्यासोबत राजकीय वाटचाल सुरू केली, मग आता भाजपलाच शिंदे यांची भीती वाटू लागली आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजपमधील कोणत्या नेत्याने एकनाथ शिंदे यांना संपवण्याचा विडा उचलला आहे, हे स्पष्ट करावं, असं आव्हानही कदम यांनी दिलं. त्यामुळे कथित ऑडिओ क्लिपवरून सुरू झालेला वाद आता सत्ताधारी पक्षांमधील आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे.

त्या क्लिपची चौकशी झाली पाहिजे, यामागे कोण आहे? एकनाथ शिंदेंना बदनाम करण्यासाठी क्लिप काढून कटकारस्थान नेमकं कोण करत आहे? दूध का दूध पानी का पानी झालं पाहिजे. मी स्वतः नरेंद्र मोदी, अमित शहा , मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे. अस्थिनमधील साप कोण आहे? हे समजलं पाहिजे, एकनाथ शिंदेंना संपवण्याचा विडा भाजपमध्ये घेणारे कोण आहेत? हे लोकांसमोर आलं पाहिजे, असं यावेळी कदम यांनी म्हटलं आहे.

 

 

 

Tags

follow us