…तर माझे डोळे सुंदर हवे; गावितांच्या विधानावर नितेश राणेंची टोलेबाजी!

आदिवासी मंत्री विजयकुमार गावितांच्या(Vijaykumar Gavit) अजब दाव्यावर आता भाजपचे आमदार नितेश राणेंनीही(Nitesh Rane) टोलेबाजी केली आहे. नियमित मासे खाल्ल्याने डोळे ऐश्वर्या रॉयसारखे सुंदर होणार असतील तर माझे डोळे सुंदर व्हायला हवे होते, आम्ही कोकणातले लोकं तर रोजच मासे खातो, मग कोकणातल्या सर्वांचेच डोळे सुंदर झाले पाहिजे, अशी टोलेबाजी राणे यांनी केली. मासे खाल्ल्याने ऐश्वर्या रॉयसारखे […]

Nitesh

Nitesh rane

आदिवासी मंत्री विजयकुमार गावितांच्या(Vijaykumar Gavit) अजब दाव्यावर आता भाजपचे आमदार नितेश राणेंनीही(Nitesh Rane) टोलेबाजी केली आहे. नियमित मासे खाल्ल्याने डोळे ऐश्वर्या रॉयसारखे सुंदर होणार असतील तर माझे डोळे सुंदर व्हायला हवे होते, आम्ही कोकणातले लोकं तर रोजच मासे खातो, मग कोकणातल्या सर्वांचेच डोळे सुंदर झाले पाहिजे, अशी टोलेबाजी राणे यांनी केली. मासे खाल्ल्याने ऐश्वर्या रॉयसारखे सुंदर डोळे होत असल्याचा दावा विजयकुमार गावित यांनी केला आहे. धुळ्यातल्या आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानावरुन त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.


दोन-चार महिने कांदा खाल्ला नाही तर काय बिघडते ? दादा भुसे यांचे वादग्रस्त विधान

आमदार नितेश राणे म्हणाले, नियमित मासे खाल्ल्याने डोळे ऐश्वर्या रॉयसारखे सुंदर होणार असतील तर माझे डोळे सुंदर व्हायला हवे होते. आम्ही कोकणातले लोकं तर रोजच मासे खातो, मग कोकणातल्या सर्वांचेच डोळे सुंदर झाले पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत. गावीत कुठल्या संदर्भात बोलले ते त्यांना विचारावं लागणार असून गावीत यांनी असे कुठले संशोधन केले आहे? ते विचारावे लागणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

‘माश्यांमुळे ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर, नियमित खाल्यास बाईमाणूस पण चिकनी दिसते : मंत्री गावितांचं वक्तव्य

यावेळी बोलताना नितेश राणे यांनी राज्यातील इतर विषयांवरही भाष्य केलं असून विरोधकांवरही टीकेची तोफ डागली आहे. त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट कोकणातून निवडणूक लढवण्याचं चॅलेंजच दिलं आहे. ते म्हणाले, संजय राऊत यांनी मुंबईमधून लोकसभा लढवण्याची तयारी करण्यापेक्षा रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून लढवण्याचे मी त्यांना आव्हान देतो. डिपॉझिट कसे जप्त होते, संजय राऊत यांची काय इज्जत आहे हे पूर्ण राज्याला कळेल. म्हणून हिम्मत असेल तर रत्नागिरीमधून निवडणूक राऊत यांनी लढवून दाखवावी, असं राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, संजय राऊत आणि नितेश राणे यांच्यात नेहमीच वाकयुद्ध सुरु असल्याचं दिसून येतं. आता नितेश राणे यांनी संजय राऊतांना थेट कोकणातून निवडणुकीत उतरण्याचं चॅलेंजच केलं आहे. राणेंचं या चॅलेंजवर संजय राऊत कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Exit mobile version