Download App

तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं विधान

सर्वोच्च न्यायालयाने जर आधीची परिस्थिती पुन्हा आणण्याचा (स्टेटस् को अॅंटी) निर्णय दिला तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात, असं मत ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान, दहाव्या सूचीनूसार 16 आमदार अपात्र ठरले पाहिजेत जर असं झालं तर उर्वरित 24 आमदार अपात्र ठरु शकतील, असंही ते म्हणाले आहेत.

‘सत्तासंघर्षाचा निकाल दोन दिवसांत न आल्यास पुन्हा सुनावणी’ उज्वल निकम असे का म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर 16 आमदार अपात्र ठरले असते. उद्धव ठाकरेंनी नैतिक कारणामुळे राजीनामा दिला आहे. राजकारणात नैतिकता आणणं गुन्हा नाही. स्टेटस् को अॅंटी (आधीची परिस्थिती पुन्हा आणण्याचा निर्णय) असे सर्वोच्च न्यायालयाने याआधीच्या केसेसमध्ये निर्णय दिले आहेत. राष्ट्रपती राजवट आल्यानतंर ती रद्द करुन त्यांच्याजागी पहिल्या मुख्यमंत्र्याला पुन्हा बसवलं असल्याचं बापट म्हणाले आहेत. मात्र, सर्वाच्च न्यायालयाने असे निर्णय आधीच्या केसेसध्ये दिलेले आहेत. आता असा निर्णय सर्वोच्च न्यायालय देईल की नाही? याबद्दल शाशंका असल्याचं मत त्यांनी मांडलंय.

NEET Exam: सांगलीत परीक्षा केंद्रावर धक्कादायक प्रकार, नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे उतरवले कपडे

बहुमतात जेव्हा सत्र बोलावलं त्यानंतरच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाला विश्वासात घेऊन राजीनामा दिला नाही. सर्वोच्च न्यायालयाने तेच जर रद्द केलं तर पुन्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकणार असल्याचं ते म्हणाले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर 16 अपात्र आमदारांनंतर तेही अपात्र ठरले असते. ठाकरेंनी नैतिक कारणामुळे राजीनामा दिला आहे. राजकारणात नैतिकता आणणं गुन्हा नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

Karnataka Election 2023 : आजची रात्र वैऱ्याची; कर्नाटक विधानसभेसाठी उद्या मतदान

तसेच आताचे अध्यक्ष आहे त्यांनाच हा अधिकार मिळेल. पण सर्वोच्च न्यायालयाने फार ड्रास्टिक्ट डिसीजन दिला की, राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी जे सत्र बोलावलं होतं, ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने बोलावलं नव्हतं. त्यामुळे राज्यपालांचे आदेश चुकीचे आहेत, असा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने लावला तर सर्वोच्च न्यायालय स्टेट्सको अँटी निर्माण करू शकतं. म्हणजे आधीची स्थिती पूर्ववत करू शकतं. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात.

दरम्यान, आधीच दिरंगाई झाली असून आता एक जज निवृत्त होणार आहे. त्यामुळे नवीन जज नेमला तर आणखी सहा महिने खटला लांबला जाणार आहे. त्यामुळे गुरुवारी किंवा शुक्रवारी हा निकाल आला पाहिजे, असं मला वाटतं, असं उल्हास बापट म्हणाले.

Tags

follow us