Anna Hajare : जनता मालक असून शिक्षणमंत्री सेवक आहेत, त्यामुळे मालकांनी मागणी केल्यास राजीनामा दिला पाहिजे, या शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन दिलंय. अहिल्यानगरच्या वाडिया पार्क येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ अण्णा हजारेंनी लाक्षणिक मौन आंदोलन केलं. या आंदोलनावेळी हजारे भावूक झाल्याचं दिसून आले. त्यानंतर त्यांनी राळेगणसिद्धीत माध्यमांशी संवाद साधला.
पुढे बोलताना अण्णा हजारे म्हणाले, जनता ही मालक आहे आणि शिक्षणमंत्री हे सेवक आहेत. त्यामुळे मालकांनी मागणी केली असल्यास त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, हे त्यांचे कर्तव्य आहे, अशा शब्दांत त्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे समर्थन केले आहे.
अण्णा हजारे यांनी याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट पत्र लिहून संवादातून प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. त्याचवेळी त्यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज 23 जुलैला अहिल्यानगर शहरात मौन आणि धरणे आंदोलन करणार असल्याचं सांगितलं होतं. लोकशाहीत जनतेचा आवाज दडपून नव्हे, तर संवादातून प्रश्न सोडवावा, अशी सूचना हजारे यांनी पत्रातून केली होती.
तुकाराम मुंढेंच्या एफडीएची बीएमसी मुख्यालयात धडक, मुंबई महापालिका मुख्यालयातील कॅन्टीन केले सील
तसेच आपला देश महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाच्या विचारांचा आणि भारतीय संविधानाने दिलेल्या लोकशाही मूल्यांचा वारसदार आहे. मतभेद असणे स्वाभाविक आहे; मात्र त्याचे निराकरण संवाद, संवेदनशीलता आणि परस्पर आदराच्या माध्यमातूनच व्हायला हवे. शासनाने संयम, सहिष्णुता आणि संवेदनशीलतेचे दर्शन घडवावे, हीच अपेक्षा आहे. जनतेचा विश्वास टिकविणे हे कोणत्याही लोकशाही सरकारचे सर्वोच्च कर्तव्य असते. आपण या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक संवाद साधून लोकशाही मूल्यांना बळकटी द्याल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे हजारे यांनी पत्रात म्हटले होते.
दरम्यान, एकीकडे विरोधक आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे तर दुसरीकडे, जंतरमंतरवर काल रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्याची घटना घडली. दिल्लीतील जंतरमंतर इथं कॉक्रोच पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके उपोषण करत आहेत. २२ जुलैच्या रात्री पुन्हा एकदा अचानक आंदोलनाला पुन्हा एकदा हिंसक वळण मिळालं असून जंतर-मंतरवर जमलेला आंदोलकांचा जमाव पुढे टॉलस्टॉय मार्गावर पोहोचला. यावेळी आंदोलकांनी पोलीस आणि रॅपिड अॅक्शन फोर्सच्या जवानांवर दगडफेक आणि बाटल्या फेकल्याचा आरोप केला आहे.
Maharashtra Rain Alert : पुढील 48 तास राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
दरम्यान, नीट पेपर लिक प्रकरणी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन करताना राहुल गांधी यांना पोलिसांनी फरफटत नेलं. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अमानूषपणे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला आहे. या संपूर्ण घडामोडींनंतर राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार गांधी यांनी परिषदेतून पंतप्रधान मोदी यांनी माफी मागून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची मागणी केलीयं.
