सोलापूर जिल्हा बँकेत भाजपची एकहाती सत्ता; 18 जागांवर मारली बाजी

Solapur District Bank Election Result : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निकाल

Solapur District Bank Election Result

Solapur District Bank Election Result

Solapur District Bank Election Result : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झालं असून या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. 19 संचालकपैकी 18 जगांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहे. तर एका जागेवर मोहिते पाटील प्रणित स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलला विजय मिळाला आहे. 19 जागांपैकी 10 जागा भाजप प्रणित सहकार विकास पॅनलने बिनविरोध जिंकल्या होत्या. तर उर्वरित 9 जागांसाठी झालेल्या निवडणुकीसाठी आज (27 नोव्हेंबर) निकाल जाहीर करण्यात आले. या निकालात भाजपने दणदणीत विजय मिळवला.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विजयी उमेदवार 

भाजप पॅनल  

 निवडणूक झालेल्या 9 जागाचे विजयी उमेदवार :-

बाबासाहेब देशमुख : (सांगोला वि. सो.)
अर्चना घाडगे : (महिला)
शामल बागल : (महिला)
राजेंद्र बंदीछोडे : (इतर भटक्या जा.)
रणजितसिंह शिंदे : (कृषी व प्रक्रिया)
मनीष देशमुख : (बँक व पतसंस्था)
सूर्यादित्य साळुंखे : (दुग्ध विकास)
महादेव कांबळे : (अनुसूचित जाती)

मोहिते पाटील पॅनल (एकूण – 1)

अर्जुनसिंह मोहिते पाटील(माळशिरस सोसायटी)

बिनविरोध

राजेंद्र राऊत : बार्शी वि. सोसा.
प्रशांत परिचारक : पंढरपूर वि. सोसा.
विक्रांत (बाळराजे) पाटील : मोहोळ वि. सोसा.
सिद्धेश्वर आवताडे : मंगळवेढा वि. सोसा.
यशराज शिंदे : माढा वि. सोसा.
श्रीदीप हसापुरे : दक्षिण सोलापूर वि. सोसा.
पृथ्वीराज माने : उत्तर सोलापूर वि. सोसा.
शंभूराजे जगताप : करमाळा वि. सोसा.
सचिन कल्याणशेट्टी : अक्कलकोट वि. सोसा.
अजिंक्यराणा पाटील : ओबीसी

मनोज जरांगे सुपारीबाज…मंत्री योगेश कदमांची थेट टीका

Exit mobile version