Bhagirath Bhalke May Join Eknath Shinde Shiv Sena meets Bharat Gogawale : सोलापूरच्या राजकारणात (Solapur Politics) मोठा भूकंप येण्याची चिन्हे दिसत आहेत. नुकताच काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता कॉंग्रेसचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येवून ठेपल्या आहेत. आहे. भालके शिंदेंच्या शिवसेनेसोबत (Eknath Shinde) गेल्यास पंढरपुरात कॉंग्रेस आणि खासदार प्रणिती शिंदे यांना मोठा धक्का बसणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते, मंत्री भरत गोगावले पंढरपुरात आले (Solapur Politics) होते. त्यांचा भालके यांनी भेट घेत सत्कार केलाय. यावेळी भाजपच्या प्रशांत परिचारक यांचे निकटवर्तीय नागेश भोसले सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे चर्चांना आणखी उधाण आलंय. मात्र भालके यांनी या चर्चा नाकारल्या आहेत.
भालके गटामध्ये नाराजी?
2024 च्या विधानसभा निवडणुकीत भालके यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे, त्यांनी ऐनवेळी शरद पवार गटातून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यामुळे महाआघाडीत असंतोष निर्माण झाला. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी थेट दिल्लीहून त्यांच्यासाठी तिकीट आणले होते, पण ही जागा आधीपासूनच शरद पवार गटाची असल्याने, त्यांनी आरोग्यमंत्र्यांचे पुतणे अनिलदादा सावंत यांना रिंगणात उतरवलं. या तिरंगी लढतीचा फायदा भाजपचे समाधान आवताडे यांना झाला आणि त्यांचा विजय झाला.
टी 20 रँकिंगमध्ये टीम इंडियाचा दबदबा, पहिला नंबरही मिळवला; ‘या’ खेळाडूला पछाडणे कठीणच
सलग दोन पराभवांनंतर भालके गटामध्ये नाराजीचं वातावरण आहे. तरीसुद्धा काँग्रेस सोडण्याचा अधिकृत निर्णय अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही, असं त्यांच्या गटाकडून सांगण्यात येतंय. मात्र, नुकतीच झालेली भालके आणि शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक नेते गोगावले यांच्यातील भेट, नव्या राजकीय चर्चांना उधाण देणारी ठरली आहे.
सोलापूरच्या राजकारणात नव्या घडामोडी
भारत भालके यांच्या निधनानंतर 2021 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भालके यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2024 साठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने स्पष्ट भूमिका न घेतल्याने भालके काँग्रेसमध्ये गेले. पण तिथेही त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. आता भालके पुन्हा शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं संकेत मिळत असल्याने, सोलापूरच्या राजकारणात नव्या घडामोडींचं वर्तुळ तयार झालं आहे. त्यांच्या पुढील निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.