Download App

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात राज्य सरकारला मोठा झटका; आंबेडकर यांची पोस्ट करत माहिती

एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. राज्य सरकारकडून करण्यात आलेली अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

  • Written By: Last Updated:

Somnath Suryavanshi : सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात (Somnath Suryavanshi Case) राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. राज्य सरकारकडून करण्यात आलेली अपील सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळली आहे. गुन्हा दाखल करण्याचा उच्च न्यायालयाच्या आदेशांना राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची याचिका फेटाळली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या माहितनुसार, परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांवर गुन्हा दाखल करणं योग्य ठरवलं आहे. तसेच या प्रकरणात आम्ही जे जे डॉक्टर सहभागी होते त्यांना देखील आम्ही आरोपी करणार आहोत. असं देखील यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर दुसरीकडे या प्रकरणात हात झटकण्याचा सरकारचा प्रयत्न होता असं न्यायालयाच्या निदर्शनास आम्ही आणून दिला असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.

4 जुलैला रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. खंडपीठाच्या या आदेशाला आव्हान देत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

प्रकरण काय?

11 डिसेंबर 2024 रोजी परभणीत बंदची हाक देण्यात आली होती. बंददरम्यान काही भागांमध्ये जाळपोळ आणि दगडफेकही झाली. त्यानंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून अनेकांवर गुन्हे दाखल केले होते. त्याच वेळी सोमनाथ सूर्यवंशी यांनाही अटक करण्यात आली. अटकेनंतर न्यायालयीन कोठडीत असतानाच सोमनाथचा मृत्यू झाला. या प्रकरणात परभणी एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी आंबेडकरी संघटनांकडून करण्यात आली होती.

निवडणूक आयोगाची तयारी सुरु, ‘या’ महिन्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी 

follow us