सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण : पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश, न्यायालयाच्या निर्णयाचे विजय वडेट्टीवारांकडून स्वागत

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण : पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश, न्यायालयाच्या निर्णयाचे विजय वडेट्टीवारांकडून स्वागत

Vijay Wadettiwar On Somnath Suryavanshi Death Case : राज्यातील चर्चित सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावर (Somnath Suryavanshi Death Case) उच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिलाय. यामध्ये पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी (Vijay Wadettiwar) सरकारवर आणि पोलीस प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.

आता न्याय मिळेल…

विजय वडेट्टीवार म्हणाले की, आज उच्च न्यायालयाने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणात न्याय दिला आहे. या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. हा खून पोलिसांनीच केला असून सरकारने सुरुवातीपासूनच चुकीची भूमिका (Maharashtra Goverment) घेतली होती. त्यांच्या कुटुंबियांना आता न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. राहुल गांधी यांनी या प्रकरणी स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यांनी कुटुंबियांना भेट दिली होती, न्यायासाठी मार्च काढला होता. मात्र सरकारने या सर्व आंदोलनाचा आवाज दडपण्यासाठी लाठीचार्जचा आदेश दिला. जनतेकडून कोणताही हिंसक उद्रेक झाला नव्हता, तरीही पोलिसांनी अमानवी वर्तन केलं.

पुण्यात शिकणाऱ्या गरजू-गुणवंत विद्यार्थ्यांना दिली जाणार विनायकी – विनायक निम्हण शिष्यवृत्ती

पोलिसांना आणि राज्य सरकारला चपराक

सरकारने सुरुवातीला सांगितलं होतं की, सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला आहे, मारहाण झालेली नाही. मात्र, आता उच्च न्यायालयाने या युक्तिवादाला फाटा दिला असून पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. वडेट्टीवार म्हणाले की, हा निर्णय म्हणजे पोलिसांना आणि राज्य सरकारला जोरदार चपराक आहे. एका सामान्य वकिलाचा बळी या राज्यकर्त्यांनी घेतला. आम्हाला सरकारकडून न्यायाची अपेक्षा नव्हतीच, मात्र न्यायालयाने दिलेला निर्णय हा लोकशाहीत अजूनही आशा आहे हे दाखवतो, असंही वडेट्टीवार म्हणाले.

निलेश साबळे यांचा विषय पुन्हा काढताच… शरद उपाध्ये यांना शाब्दिक टोले

मोदी सरकारवरही निशाणा

याशिवाय विजय वडेट्टीवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवरही टीकेचे बाण सोडले. बिहारमधील जनता आता मोदी सरकारच्या खोट्या आश्वासनांना कंटाळली आहे. लोकशाहीला बगल देण्यासाठी आता मतदानासाठी ऍप वापरण्याचा हास्यास्पद आणि धोकादायक प्रकार सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे तंत्र वापरून विधानसभा निवडणुकांवर परिणाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. मात्र यामुळे जनता संतप्त होईल आणि लवकरच आक्रमक पवित्रा घेईल, असा इशाराही यावेळी वडेट्टीवार यांनी दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube