Somnath Suryawanshi : सोमनाथ सुर्यवंशी (Somnath Suryawanshi) यांचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झाला असल्याचा धक्कादायक खुलासा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याची माहिती देखील या अहवालात देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे या प्रकरणातील सर्व संबंधित पोलिसांना नोटीस बजावत त्यांच्याकडून उत्तर मागवण्यात आले आहे. सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला असल्याचा दावा पोलिसांनी केला होता मात्र आता सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झाला असा खुलासा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये करण्यात आला आहे.
या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. राज्य मानवाधिकार आयोगाकडे गोपनिय अहवाला दाखल करण्यात आला आहे. 15 डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी राज्यातील अनेक शहरात आंदोलनं करण्यात आले होते.
न्यायदंडाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या या अहवालात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असून परभणी जिल्ह्यातील नवामोंढ पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली. असं या अहवालात म्हटले आहे.
जल-जीवन योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार…, लंकेंनी संसदेत केली चौकशीची मागणी
सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशीनंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी तब्बल 451 पानांचा गोपनीय अहवाल तयार करुन राज्य मानवधिकार आयोगापुढे सादर केला आहे.