Ashok Chavan on Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याचे संकेत अशोक चव्हाणांनी दिलेत. मुनगंटीवारांचा रेस्ट पिरेड सुरु असून लवकरच हा ब्रेक संपेल असे विधान चव्हाणांनी केले. (Ashok Chavan ) नांदेडमध्ये मंगळवारी (११ फेब्रु.) मुनगंटीवारांचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा पार पडला. आर्य-वैश्य समाजातर्फे हा जीवनगौरव पुरस्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना अशोक चव्हाणांनी मुनगंटीवारांचे तोंडभरून कौतुक केले.
शिंदे यांच्या सत्कारावरून राऊतांचा पवारांवर आसूड, तर बावनकुळेंकडून संजय राऊतांचा समाचार
यावेळी चव्हाण यांनी राजीनाम्यावरूनही भाष्य केलं. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गतवर्षी 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली. या हत्याकांडात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी बीडच्या सर्वपक्षीय नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण मुंडे यांनी या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच योग्य तो निर्णय घेतील असे सांगत त्यांची मागणी धुडकावून लावली आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी उपरोक्त टीका केली आहे.
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
अशोक चव्हाण यांच्यावर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ‘अशोक पर्व’ नावाच्या पुरवणीसाठी पेड न्यूज दिल्याचा आरोप करण्यात आला. निवडणूक आयोगाने त्याची गंभीर दखल घेतल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. त्याचवेळी आदर्श सोसायटी घोटाळाही समोर आला होता. कारगिल युद्धातील विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्याचा चव्हाणांवर आरोप झाला. त्यामुळे काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांच्याकडून 2010 मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेतला. येथूनच अशोक चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीला गळती लागल्याचे सांगितले जाते.