Download App

Video: फडणवीसांचा काँग्रेसला सुरूंग लावण्याचा प्लान ठरला; भाजपातील नाराजी नाट्यात होणार नव्या ‘वारा’ची एन्ट्री

देवेंद्र फडणवीस यांच्या अगोदर भाषण करताना आमदार आमदार जोरगेवार यांनी चांगलीच फटकेबाजी केली होती. त्यानंतर भाषणासाठी आलेले

  • Written By: Last Updated:

M.S. Kannamwar Jayanti : आम्ही हेडगेवारांचे आनुयायी आहोत. त्यामुळे मुनगंटीवार किंवा वडेट्टीवार यामध्ये कोणतेही वार असले तरी आमच्याकडे सन्मानच आहे अशी मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते मा.सा. कन्नमवार यांची आज 125 वी जयंतीनिमीत्ताने आयोजीत कार्यक्रमात चंद्रपूर येथे बोलत होते. (M.S. Kannamwar) यावेळी व्यासपिठावर आमदार किशोर जोरगेवार आणि कांग्रेस नेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते.

CM चंद्रपुरात सुधीरभाऊ मुंबईत, कार्यक्रमालाही दांडी; मुनगंटीवारांनी सगळचं सांगितलं..

देवेंद्र फडणवीस यांच्या अगोदर भाषण करताना आमदार आमदार जोरगेवार यांनी चांगलीच फटकेबाजी केली होती. त्यानंतर भाषणासाठी आलेले वडेट्टीवार यांनी चांगलीच बॅटींग केली. त्यामुळे चर्चा जोरात सुरू होती. शेवटी मुख्यमंत्री फडणवीस भाषणासाठी आले तेव्हा त्यांनी आम्ही हेडगेवार यांचे अनुयायी आहोत. त्यामुळे कुणीही वार असले तरी आम्ही सर्वांचाच सन्मान करतो अशा शब्दांत जोरदार फटकेबाजी केली. त्यांच्या या विधानानंतर वडेट्टीवार भाजपात जाणार तर नाहीत ना अशी चर्चा रंगली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात कार्यक्रम होत असताना माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित न राहिल्याने जोरदार उलट-सुलट चर्चा रंगली आहे. त्यावर आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जोरगेवार यांच्या मते या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या यादीत सुधीर मुनगंटीवार यांना स्थान देण्याचा निर्णय हा आयोजन समितीचा आहे. आयोजन समितीनेच या कार्यक्रमाचे अध्यक्षपद विजय वडेट्टीवार यांना दिलं आहे. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, मुनगंटीवार यांना फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही असंही जोरगेवार म्हणाले.

follow us