मोठी बातमी! आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारण…
Aaditya Thackeray Meet Devendra Fadanvis In Mumbai : विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे अन् भाजप पुन्हा एकत्र येतील, अशा चर्चा सुरू आहेत. राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आलीय. यामध्ये भाजपला बहुमत मिळालंय, त्यासोबत भाजपने अनेक महत्वाची खाती स्वत:कडे ठेवलीत. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. अशातच आज शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय. आदित्य ठाकरे फडणवीसांना (Devendra Fadanvis) का भेटले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भयंकर! लॉस एंजेलिसमध्ये अग्नितांडव, पाच मृत्यू, एक हजार घरे भस्मसात; हॉलीवूडलाही फटका
युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केलीय. यामध्ये पाण्याचा प्रश्न देखील महत्वाचा (Maharashtra Politics) आहे. आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी आणलेल्या धोरणानुसार, मुंबईतील प्रत्येक व्यक्तीला पाणी मिळणे हा त्याचा अधिकार आहे. मात्र याआधीच्या मिधें सरकारने ह्यावर आणलेली स्थगिती त्वरीत उठवावी. जेणेकरुन सर्व मुंबईकरांना ह्याचा लाभ मिळेल.
आजच्या भेटीत दुसरा महत्वाचा मुद्दा पोलीस वसाहतींचा होता. आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांना म्हणाले की, निवृत्त पोलीस कुटुंबांना पोलीस वसाहतींमध्ये राहण्यासाठी लागणाऱ्या दंड कमी (Aaditya Thackeray Meet Devendra Fadanvis) करावे. निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना मुंबईत कायमस्वरुपी घरे उपलब्ध उपलब्ध करुन द्यावीत. महाविकास आघाडी सरकारने नवीन पोलीस वसाहतींसाठी 600 कोटींची तरतूद केली होती. वरळी, माहिम, नायगाव, कुर्ला येथील पोलीस वसाहतींचे प्रस्ताव मागील 2 वर्षांपासून प्रलंबित आहेत, ते पुन्हा सुरु करावेत.
कलेक्टर जमीन फ्री होल्ड करण्यासाठी प्रीमियम कमी करणे. कलेक्टर जमिनीच फ्री होल्ड रुपांतरण करण्यासाठी प्रीमियम कमी करण्याचे धोरण लवकरात लवकर लागू करावे, यासंदर्भात देखील आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा केल्याचं समजतंय. मुंबईतील विविध समस्या आणि मतदारसंघातील प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिलीय. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून आमदार आदित्य ठाकरेंनी आज तिसऱ्यांदा त्यांची भेट घेतली आहे.