सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर तटकरेंनी घेतली शहांची भेट; राष्ट्रवादी एनडीएसोबत जाण्यावर खलबत?

शरद पवार यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतरच राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार अशी चर्चा.

News Photo   2026 07 27T210604.428

एकाच दिवशी सुप्रिया सुळे अन् तटकरेंनी घेतली अमित शहांची भेट; राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार?

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा (NCP) मोठ्या घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) प्रवेश होणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांत वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी पतप्रधानांची भेट घेतली तर आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यातील बैठक यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य NDA प्रवेशाबाबतची माहिती राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही देण्यात आल्याचं बोलले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य NDA प्रवेशाच्या चर्चांना अधिक वेग आला.

कॉक्रोच जनता पार्टीला 1 कोटींची मदत जाहीर; आंदोलकांसाठी वेबसाईट अन् कायदेशीर मदत पुरवणार

काही माध्यमांमध्ये भाजपकडून दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलिनीकरणाची अट असल्याच्याही चर्चा समोर आल्या होत्या. मात्र, या दाव्यांवर कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीत विविध राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली असून, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य NDA प्रवेशाबाबतही चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सूत्रांच्या दाव्यानुसार, शरद पवार गटातील काही लोकप्रतिनिधी NDA सोबत जाण्यास इच्छुक असल्याचीही चर्चा आहे. तथापि, याबाबत शरद पवार, त्यांच्या पक्षाकडून किंवा भाजपकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगली असून, पुढील काही दिवसांत याबाबत नेमके काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version