NCPI Alliance : पुन्हा राजकीय भूकंप; 20 खासदारांसह ‘हा’ पक्ष NDA मध्ये सामील
NCPI Alliance : संसदेतील मान्सून अधिवेशनापूर्वी देशातील राजकारणात एक मोठी घडामोड घडल्याने पुन्हा एकदा अनेक चर्चांना उधाण आले आहे.
NCPI Alliance : संसदेतील मान्सून अधिवेशनापूर्वी देशातील राजकारणात एक मोठी घडामोड घडल्याने पुन्हा एकदा अनेक चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या टीएमसी पक्षाची साथ सोडणाऱ्या 20 खासदारांनी नॅशनल काँग्रेस पार्टी ऑफ इंडिया पक्षात विलीन होण्याची घोषणा केली होती. या पक्षाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर आता हा पक्ष सत्ताधारी एनडीएमध्ये सहभागी झाला आहे. ओम बिर्ला यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर NCPI आता एनडीएमधील दुसरा सर्वात मोठा पक्ष बनला आहे.
नुकतंच NCPI च्या संसदीय गटाची पहिली महत्त्वपूर्ण बैठक नवी दिल्लीत झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुदीप बंडोपाध्याय यांनी सांगितले की, पक्षाला संसदेत स्वतंत्र ब्लॉक, विशिष्ट आसनव्यवस्था आणि नवीन डिव्हिजन क्रमांक देण्यात आले आहेत. सर्व खासदारांना त्यांच्या नवीन आसन क्रमांकांची माहिती देण्यात आली आहे. पक्ष संसदेचे कामकाज सुरळीत चालण्याच्या बाजूने आहे आणि सभागृहासमोर येणाऱ्या प्रत्येक मुद्द्यावर व चर्चेत सक्रिय सहभाग घेण्याचा त्यांचा मानस आहे असं त्यांनी म्हटले आहे.
नागालँडमध्ये दरड कोसळली; लहान मुलांसह अनेकांचा मृत्यू; 4 मृतदेह सापडले
#WATCH | New Delhi: On NCPI’s Parliamentary Party meeting, Rebel TMC MP Sudeep Bandyopadhyay says, “Today, the first time NCPI parliamentary party was held. This meeting was the most important one for us. Our allotment of seats, division numbers, and separate block have all been… https://t.co/SEKsts8MCT pic.twitter.com/wwcZ5p2AJo
— ANI (@ANI) July 19, 2026
पंतप्रधान मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा
बंडोपाध्याय यांनी सांगितले की, शनिवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याशी जवळपास एक तास ‘वन-टू-वन’ (वैयक्तिक) चर्चा केली. या भेटीदरम्यान, त्यांनी पंतप्रधानांकडे अशी विनंती केली की, नव्याने सामील झालेल्या NCPI खासदारांना विश्वासात घेतले जावे जेणेकरून त्यांना आघाडीचा एक अविभाज्य भाग असल्याचे वाटेल. बंडोपाध्याय यांच्या मते, पंतप्रधानांनी त्यांचा मुद्दा सकारात्मकतेने स्वीकारला आणि योग्य पावले उचलण्याचे आश्वासन दिले. याव्यतिरिक्त, त्यांनी गेल्या दोन दिवसांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दोन दीर्घ बैठका घेतल्या. या 20 खासदारांच्या समावेशाबाबत शहा देखील खूप उत्साही दिसले.