पोलिसांना धक्काबुक्की, रस्ता अडविला; ममता बॅनर्जींविरोधात अखेर गुन्हा
Mamata Banerjee: तृणमूल छात्र परिषद (TMCP)च्या स्थापना दिनानिमित्त 28 ऑगस्ट रोजी कोलकात्यातील कॅथेड्रल रोड येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
FIR Against Mamata Banerjee For Violating Calcutta HC Order At TMC Event: तृणमूल काँग्रेसच्या (TMC) कार्यक्रमादरम्यान कोलकाता (Calcutta) हायकोर्टाच्या आदेशाचे कथित उल्लंघन माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना भोवले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात कोलकाता पोलिसांनी स्वतःहून (Suo Motu) गुन्हा दाखल केला आहे
ठेवी 384 कोटींच्या अन् कर्ज वितरण 423 कोटींचे; मुरकुटेंशी निगडीत अशोक बँकेवर आरबीआयचे निर्बंध
तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या म्हणजेच तृणमूल छात्र परिषद (TMCP)च्या स्थापना दिनानिमित्त 28 ऑगस्ट रोजी कोलकात्यातील कॅथेड्रल रोड येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम घेण्यास कोलकाता हायकोर्टाने परवानगी दिली होती. मात्र, रस्त्याचा एक मार्ग वाहतुकीसाठी खुला ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रमादरम्यान न्यायालयाने घालून दिलेली ही अट कथितरित्या पाळण्यात आली नाही. तसेच हायकोर्टाने निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा कार्यक्रम अधिक वेळ सुरू राहिल्याचा आरोपही पोलिसांनी केला आहे.पीटीआयनुसार ममता बॅनर्जी आणि TMCP कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात हेस्टिंग्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 61(2), 223, 125(a), 132 आणि 285 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोठी बातमी! रशियाचा युक्रेनमध्ये भीषण ड्रोन हल्ला; गोदामात स्फोट, 37 जणांचा मृत्यू, 42 जण जखमी
न्यायालयाच्या आदेशाचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तपासादरम्यान या उल्लंघनात सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींची भूमिका तपासली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा आरोप
पोलिसांच्या तक्रारीनुसार, कार्यक्रमादरम्यान TMC समर्थकांनी कथितरित्या बॅरिकेड्स बाजूला केले, पोलिस कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की केली आणि कॅथेड्रल रोडवरील वाहतुकीत अडथळा निर्माण केला. याशिवाय, न्यायालयाने परवानगी दिलेल्या वेळेपेक्षा कार्यक्रम सुरू ठेवल्याचा आरोपही करण्यात आला आहे.