Nagaland Landslide : नागालँडमध्ये दरड कोसळली; लहान मुलांसह अनेकांचा मृत्यू; 4 मृतदेह सापडले
Nagaland Landslide : नागालँडच्या 'मोन' जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची घटना घडली असून या दुर्घटनेत लहान मुलांसह आठ जणांचा
Nagaland Landslide : नागालँडच्या ‘मोन’ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची घटना घडली असून या दुर्घटनेत लहान मुलांसह अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. माहितीनुसार, आतापर्यंत ढिगाऱ्यातून चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. दरड कोसळल्यानंतर डोंगरावरून पाण्याचा प्रचंड प्रवाह वाहत आहे, ज्यामुळे बचाव पथकांना ढिगारा हटवणे आणि अडकलेल्यांना बाहेर काढणे कठीण जात आहे. स्थानिक स्वयंसेवक, पोलीस, भारतीय लष्कराचे जवान आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) सध्या घटनास्थळी तैनात आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, दरडीमुळे परिसरातील अनेक घरे जमीनदोस्त झाली असून, अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. प्रशासनाने मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. मोन जिल्ह्याचे उपायुक्त (DC) वेन्येई कोन्याक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ जणांचा (Nagaland Landslide) मृत्यू झाल्याची भीती आहे. आमच्या पथकाला आतापर्यंत ढिगाऱ्यातून चार मृतदेह सापडले आहेत. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव मोहीम राबवली जात आहे.
Incessant rains and a cloudburst in the wee hours of the morning in #Mon Hq, Nagaland has caused widespread destruction at various localities this morning. Human casualties reported, survivors still trapped. Rescue operations by locals hampered due to continuous rain & landslide.… pic.twitter.com/DsxPmnu7u1
— S. Phangnon Konyak (@SPhangnon) July 19, 2026
नागालँडमध्ये निसर्गाचा कोप
नागालँड सरकारने शोक व्यक्त केला आहे. सरकारी निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील विविध भागांत खराब हवामानामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. केवळ मोन जिल्हाच नाही, तर मोकोकचुंग जिल्ह्यातील ‘तुली’ (Tuli) उपविभागासह इतर अनेक भागांनाही या संकटाचा मोठा फटका बसला आहे. दरडी कोसळणे आणि अचानक आलेल्या पुरामुळे रस्ते बंद झाले आहेत, सरकारी पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे आणि राज्यातील अनेक भागांत खाजगी मालमत्तेचीही हानी झाली आहे.
खंडणी दे, नाहीतर दुकान चालू देणार नाही; शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुखाला अटक
मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा
नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आणि पीडितांसाठी तातडीने मदतीची घोषणा केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि जखमींना 74000 रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांच्याकडून करण्यात आली आहे.