“सोनं खरेदी करु नका”; GDP वाढीनंतर मोदींचा देशवासीयांना सल्ला
PM Modi Gold; GDP वाढीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशवासीयांना स्वदेशीचा मंत्र; “गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका” असा सल्ला.
PM Modi Urges People to Avoid Gold Purchases: भारताच्या अर्थव्यवस्थेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी करत 7.8 टक्के विकासदर नोंदवला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशावासीयांचं कौतूकही तसेच देशवासीयांना स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारण्याचं आवाहन केलं. विशेष म्हणजे, गरज नसेल तर सोनं खरेदी करणं टाळा, असा सल्लाही मोदींनी नागरिकांना दिला आहे.
जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थिती, कच्च्या तेलाच्या किमती आणि पुरवठा साखळीतील अडथळे यांसारखी आव्हानं असतानाही भारताने 7.8 टक्के विकासदर गाठल्याचं मोदी यांनी सांगितलं. या कामगिरीबद्दल त्यांनी देशातील नागरिकांचं अभिनंदन केलं. नागरिकांची संकल्पशक्ती आणि सामूहिक प्रयत्न यामुळे हा विकासदर साध्य झाल्याचं त्यांनी म्हटलं.
‘स्वदेशीला प्राधान्य द्या, सोनं खरेदीही टाळा’
भारताची आर्थिक गती आणखी वाढवायची असेल तर आत्मनिर्भरतेवर भर देणं आवश्यक असल्याचं मोदी यांनी स्पष्ट केलं. नागरिकांनी ‘व्होकल फॉर लोकल’चा स्वीकार करत देशात तयार होणाऱ्या वस्तूंना प्राधान्य द्यावं, असं त्यांनी सांगितलं.
7.8% growth.
Strong numbers.
Even stronger confidence. pic.twitter.com/ZVPpnAXrVU
— Narendra Modi (@narendramodi) September 1, 2026
विदेशी वस्तू आणि सेवांवरील खर्च कमी करण्याचं आवाहन करताना मोदींनी परदेशातील पर्यटन आणि विदेशात होणाऱ्या लग्नांचाही उल्लेख केला. “गरज नसेल तर सोनंही खरेदी करू नका,” असं म्हणत अनावश्यक सोन्याच्या खरेदीवर खर्च न करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
सोन्याचा भाव किती?
जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेने आपली ताकद दाखवली असल्याचं मोदी यांनी नमूद केलं. हीच विकासाची गती पुढे कायम ठेवण्यासाठी देशातील उत्पादन, स्थानिक व्यवसाय आणि स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.
अण्णा हजारेंची प्रकृती बिघडली; मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल
स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेला चालना मिळाल्यास देशाची अर्थव्यवस्था आणखी मजबूत होऊ शकते, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. तसेच भारताच्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा युवा पिढीच्या हातात विकसित भारत सोपवण्याचा संकल्प असल्याचंही त्यांनी सांगितलं.