Download App

‘…गद्दार नजर वो आये’ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचं गाणं; शिवसैनिकांमध्ये संताप, शिंदे गटाकडून तक्रार दाखल

Stand Up Comedian Kunal Kamra Video On Eknath Shinde : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Stand Up Comedian Kunal Kamra) एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कामराने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात केलेल्या एका गाण्यावरुन आता वाद निर्माण झालाय. कुणाल कामराने स्टँड अप कॉमेडीमध्ये महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केलं आहे. त्याने एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका केलीय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगात व्हायरल (Viral Video) होतोय. तर कुणाल कामराविरोधात शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याची माहिती मिळत आहे.

व्हिडिओमध्ये कुणाल कामरा म्हणतोय की, शिवसेना भाजपातून बाहेर आली. त्यानंतर शिवसेना शिवसेनेतूनच आणि एनसीपी एनसीपीतूनच बाहेर आली. ठाण्याची रिक्षा आणि चेहऱ्यावर दाढी, डोळ्यांवर चष्मा…असं वर्णन देखील कामराने त्याच्या गाण्यात केलंय. तर मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर वो आये…असं देखील म्हटलं आहे. दरम्यान कामराच्या या गाण्यामुळे शिवसैनिकांमध्ये मात्र संतापाचं वातावरण आहे.

सुजय विखेंना राज्यसभेवर पाठविणार, शिवाजी कर्डिलेंचा ‘शब्द’… पण राम शिंदेंचा श्रद्धा व सबुरीचा सल्ला

त्यामुळे कुणाल कामराविरोधात आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरीतील एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. सोशल मीडियावर कुणाल कामराने एक व्हिडिओ व्हायरल केलाय. या व्हिडिओमध्ये कामराने एक गाणं म्हटल्याचं दिसत (Maharashtra Politics) आहे. हे गाणं महाराष्ट्राच्या राजकारणाशी निगडीत आहे. या गाण्यामध्ये कामराने एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांना गद्दार म्हटलंय. तर घराणेशाही संपवण्यासाठी कोणाचा तरी बाप चोरला, असं देखील कामराने म्हटलंय.

‘सदस्य संख्या कमी झाल्यास…विश्रांती’, अजित पवारांची पक्षातील नेत्यांना तंबी, आगामी निवडणुका…

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामराचा हा व्हिडीओ शेअर केलाय. याविरोधात मात्र शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्यातून व्यंगात्मक टीका केली आहे. तर अंधरीचे आमदार मुरजी पटेल यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. शिंदेंविरोदात बदनामीकारक गाणं असेल, तर सहन करणार नाही असा इशारा देखील शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी दिलाय.

 

follow us