मुंबई : महाराष्ट्रात डान्स बार बंदी आहे. मात्र आज डान्सबारला राज्यात मोकळे रान मिळालेले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि इतर ठिकाणी ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार सुरू आहेत. अधून-मधून दाखवण्यासाठी समाजसेवा शाखेकडून धाडी टाकल्या जातात. पण डान्सबार सुरु आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री स्वर्गीय आर.आर.आबांनी धाडसी निर्णय घेतला होता, त्याची कठोर अंमलबजावणी केली होती. त्याचधरतीवर आता कडक कारवाई करण्याची गरज आहे. एका बाजूला तपास यंत्रणांनी देशभरात धुमाकूळ घातला आहे. याचाच फायदा गुन्हेगारही घेत आहेत. आता तोतया केंद्रीय अधिकारी बनून गुन्हेगार, व्यापाऱ्यांना लुटले जात आहे. कुठे आहे तुमची कायदा आणि सुव्यवस्था ? कोण सुरक्षित आहेत ? असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला केला.
Ajit Pawar यांनी काढले सरकारचे वाभाडे… विकास खुंटला… गुन्हे मात्र डबल! – Letsupp
विधानसभेत नियम २९२ अन्वये विरोधी पक्षाच्यावतीने दिलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, मिरज येथे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्याकडेची दुकाने पहाटे चार वाजता जेसीबी यंत्राच्या माध्यमातून उध्दवस्त करण्यात आली. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचा भाऊ सहभागी होता. छोट्या व्यावसायिकांची १ कोटी १३ लाख रुपयांची हानी झाली. पोलिसांच्या समक्ष हे पाडकाम झाले. परंतु, पोलिसांनी कोणताही हस्तक्षेप केला नाही. पन्नास वर्षापेक्षा जास्त जुनी ही दुकाने होती. पहाटे जेसीबी आणून दुकाने पाडण्यात आली. शंभर ते दीडशे लोकांचा जमाव हातात, लाठ्या, काठ्या, लोखंडी सळई यासारखी घातक हत्यारे घेऊन लोक येतात. तरीही पोलीसांनी काही कारवाई केली नाही. गुन्हा दाखल होऊनही आजपर्यंत कोणालाही या प्रकरणी अटक केली नाही. सरकारच या मंडळींना पाठीशी घालत आहे.
(220) Sushma Andhare : सुषमा अंधारे यांची स्फोटक मुलाखत | LetsUpp Marathi – YouTube
राज्यात मटका, जुगार, गुटखा, डान्स बार यांना बंदी आहे. मात्र राज्यातल्या अनेक भागात हे सर्व धंदे राजरोसपणे सुरु आहेत. तसेच राज्यात ऑनलाईन लॉटरी, रमीचे प्रमाण वाढले आहे. या जुगारातून शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांची फसवणूक होत आहे. तसेच तरुण पिढी या ऑनलाईन रमीकडे वळत आहे. या ऑनलाईन रमीची जाहिरात काही अभिनेते, अभिनेत्र्या करत आहेत. त्यामुळे तरुण या जाळ्यात अडकत आहेत. यावर तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले.