Download App

विधान परिषदेला केलेला गेम लक्षात ठेवला अन् ठाकरेंनी शिंदेंच्या विरोधात भाजपचाच एक्का फोडला!

नांदेड : प्रदेश भाजपचे (BJP) प्रवक्ते एकनाथ पवार (Eknath Pawar) यांनी आज (25 ऑक्टोबर) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधत पवार यांचे पक्षात स्वागत केले. पक्षात प्रवेश करताच पवार यांची संघटक पदावर नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती, खासदार संजय राऊत यांनी दिली.  एकनाथ पवार यांच्या येण्याने नांदेड जिल्ह्यात ठाकरे गटाला तगडा नेता मिळाला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. याशिवाय त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत लोहा कंधार मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. (State BJP spokesperson Eknath Pawar joined the Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) party today)

यावेळी बोलताना पवार म्हणाले, मी 30 वर्षांपासून भाजपचा कार्यकर्ता आहे. चार वर्षापासून लोहा-कंधार मतदारसंघात विकासाचे काम सुरू आहे. पण भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे नांदेड जिल्ह्याला लागलेली कीड आहे. शिवसेनेचे आमदार असताना त्यांनी अवघ्या तीन महिन्यात पक्ष बदलला. त्यामुळे यापुढील काळात लोहा-कांधरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करणार आहे. सोबतच जिल्ह्यात शिवसेना नंबर एकचा पक्ष करणार आहे, आणि लोहा कंधार मतदारसंघात शिवसेनेचा आमदार करणार असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार?; शिंदे-फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना

श्यामसुंदर शिंदेंविरोधात ठाकरे गटाची मोर्चेबांधणी :

लोहा कंधार मतदारसंघातून सध्या शेकापचे श्यामसुंदर शिंदे आमदार आहेत. पण ते भाजपचे निकटवर्तीय मानले जातात. ते खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचे मेव्हणेही आहेत. त्यांना या मतदारसंघातून भाजपच्याच तिकिटावर निवडणूक लढवायची होती. परंतु हा मतदारसंघ युतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे गेला. त्यामुळे त्यांना भाजपची उमेदवारी मिळू शकली नाही. त्यानंतर त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची मतदारसंघातील ताकद ओळखून तिकडून उमेदवारी मिळवली. तर शिवसेनेने भाजपमधून आलेल्या मुक्तेश्वर धोंडगे यांना उमेदवारी दिली होती.

युती धर्माप्रमाणे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत चिखलीकर यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणे अपेक्षित होते. मात्र चिखलीकर यांच्यासह त्यांचे चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर आणि कन्या प्रणिता देवरे यांनीही श्यामसुंदर शिंदे यांचा जोरकस प्रचार केला. निकालात त्यांनी 64 हजारांचे मताधिक्य घेतले. निकालानंतर शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा जाहीर केला. तसंच चिखलीकरांसोबत फडणवीस यांची भेटही घेतली. शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडीत असूनही शिंदे यांनी फडणवीस यांना पाठिंबा दिल्याने त्यावेळी आश्चर्यही व्यक्त करण्यात येत होते.

पाणी टंचाईमुळं रब्बी हंगामावर संकट; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं

यानंतर 2022 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले नसल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. यामुळे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना पराभव स्विकारावा लागला होता. आता आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. हेच सगळे राजकारण गृहीत धरुन ठाकरे गटाने शिंदे यांच्या विरोधात भाजपचाच हुकमी एक्का फोडला असल्याचे बोलले जात आहे.

Tags

follow us