Download App

Maharashtra : राज्य सरकारची ओबीसींसाठी घरांची नवी योजना

मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Government) ओबीसींसाठी घरांची नवी योजना आणण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येतंय. या योजनेची सरकारकडून तयारी सुरू करण्यात आलीय. या योजनेत इतर मागासवर्गीयांना (OBC) घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. लवकरच याबद्दल प्रस्ताव मांडला जाणार आहे.

अनुसूचित जाती (scheduled caste) आणि भटक्या विमुक्त जातींच्या (Nomad free caste)धर्तीवर ओबीसींसाठी नव्या घरांची योजना राबवली जाणारंय. ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ (krantijyoti savitribai phule)असं या योजनेला नाव दिलं जाणारंय. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)काळात हा प्रस्ताव आला होता. मात्र तो पूर्ण न झाल्यानं शिंदे फडणवीस सरकार हा प्रस्ताव पूर्ण करणारंय. या प्रस्तावावर काम सुरू असून लवकरच मंत्रिमंडळसमोर हा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती, ओबीसी विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी दिलीय.

महाराष्ट्रात अनुसूचित जातींसाठी रमाई आवास योजना राबवली जात आहे तर व्हिजेएनटीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविली जात आहे. सपाट भागात घर बांधायचं असल्यास त्याला 1 लाख 20 हजार आणि डोंगरी भागात घर बांधायचं असल्यास 1 लाख 30 हजार रुपयांची मदत सरकारकडून केली जाते. राज्य सरकार ओबीसींच्या घरांसाठी नियमावली तयार करत आहे. त्यानंतर हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मांडणार आहे. एक महिन्याच्या आत ओबीसींची ही योजना कार्यान्वित होऊन, त्यात ओबीसी समाजातील गरिबांना घरं मिळतील अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली.

Tags

follow us