State, religion, institutions not bigger than dignity of country; Justice Gavai’s statement amid linguistic controversy : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज महाराष्ट्र विधीमंडळात सत्कार करण्यात आला. त्यावेळी झालेल्या भाषणात गवई यांनी राज्यघटनेबाबत सखोल माहिती दिली. यामध्ये त्यांनी जेव्हा देशाच्या प्रतिष्ठेची गोष्ट येते तेव्हा तुमच्या राज्य, धर्म, संस्था यांच्या सीमा नसल्या पाहिजे. असं म्हणत हिंदी-मराठी भाषावादाच्या दरम्यान मोठं विधान केलं आहे.
काय म्हणाले न्यायमूर्ती भूषण गवई?
मी जेथे काम केलं तेथेच मी सत्कार स्विकारणार असं ठरवलं होतं. पण हा विधिमंडळामध्ये केला जाणारा सत्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण हा माझ्यासाठी राज्यातील 13 कोटी जनतेने दिलेला आशीर्वाद आहे. मी दहावी पास झालो. तेव्हा माझे वडिल विधान परिषदेचे उपाध्यक्ष होते. त्याचवेळी 1981 मध्ये विधिमंडळाच्या या नव्या इमामरतीचं उद्धाटन झालं. त्यांचं या विधिमंडळाशी 30 वर्षांचं नातं आहे. त्यामुळे येथील सत्कार माझ्यासाठी खास आहे.
राजकीय पक्ष जनतेला उत्तर द्यायला बांधिल; विधिमंडळात न्यायमूर्ती भूषण गवईंनी टोचले कान
तसेच यावेळी घटनेवर बोलताना गवई यांनी सखोल माहिती दिली. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे म्हणत की, मी पहिले भारतीय आहे आणि शेवटीही भारतीयच आहे. जेव्हा देशाच्या प्रतिष्ठेची गोष्ट येते तेव्हा तुमच्या राज्य, धर्म, संस्था यांच्या सीमा नसल्या पाहिजे. त्या देशाच्या प्रतिष्ठेच्या नंतर येणाऱ्या गोष्टी असल्या पाहिजेत. देशाच्या प्रतिष्ठेसाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे.
विधानसभा निवडणुकीसाठी नितिश कुमारांनी खेळले आरक्षण कार्ड ! महिलांना नोकरीत तब्बल 35 टक्के आरक्षण
आंबेडकर घटना समितीवर बंगालमधून निवडून आले होते. तर फाळणीनंतर ही भाग पाकिस्तानमध्ये गेल्याने त्यांना ती जागा रिकामी करावी लागली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतून निवडून दिलं गेलं. तसेच त्यांनी यावेळी जरी आपण अमेरिकेप्रमाणे संघराज्य पद्धती अवलंबली असली. तरी देखील आपल्या नागरिकांना एकच नागरिकत्व, घटना असेल. अमेरिकेप्रमाणे दोन नाही. कारण संकटकाळात देश एकसंघ राहणं गरजेचं आहे.