Raju Shetti On Sugar Price Hike : राज्यासह देशात अचानक साखरेच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने नागरिकांच्या बजेटमध्ये बिघाड झाला आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना आता आणखी एक मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारने साखरेच्या वाढत्या किंमती थांबवण्यासाठी 10 लाख टन साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात आता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेत देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा केला आहे. देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने आयातीची कोणतीही गरज नाही असं शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना म्हटलं आहे.
लेट्सअप मराठीशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, साखर (Sugar Price Hike) ही जीवनावश्यक वस्तू असल्याने साखरचे साठा किती ठेवायचा, कोणत्या गोडाऊनमध्ये साखर ठेवाली आहे याबाबत प्रत्येक गोडाऊनचे रेकॉर्ड प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडे असतं. त्या गोडाऊनध्ये किती अन्नधान्य ठेवले आहे याची देखील माहिती त्यांच्याकडे असते. त्यामुळे वेळोवेळी गोडाऊनवर छापे टाकून तिथं तेवढा साठा उपलब्ध आहे का हे बघण्याचा अधिकार देखील जिल्ह्यधिकाऱ्यांना असतो. तसेच कुठल्या व्यापाऱ्यांना किती साठा करायचा याचा देखील धोरण निश्चित असतं. त्या पद्धतीने जिल्ह्याधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्येक साखर कारखान्यावर छापे टाकून साखर कारखान्याने रेकॉर्डवर दाखवलेली साखर शिल्लक आहे की त्यापेक्षा जास्त साखर शिल्लक आहे याची तपासणी केली पाहिजे असं राजु शेट्टी म्हणाले.
तर पुढे बोलताना राजू शेट्टी (Raju Shetti) म्हणाले की, खाजगी व्यापाऱ्यांचे जे गोडाउन्स आहे त्याच्यावर देखील छापे टाकून तपासणी केली पाहिजे. मला नक्की खात्री आहे की, छापे टाकून केलेल्या तपासणीनंतर देशात किमान 20 ते 25 लाख टन साखर आजही आपल्या देशामध्ये सहज सापडू शकते. पण यासाठी संपूर्ण देशात एकाच वेळी सगळ्या जिल्ह्याधिकाऱ्यांना आदेश देऊन सगळे गोडाउन्स तपासले पाहिजे असेही यावेळी राजू शेट्टी म्हणाले.
महाप्रसादासाठी अधिकृत नोंदणी अनिवार्य; तुकाराम मुंढेंचा मोठा आदेश
शेतकरी संघटनांना 15 दिवस द्या
तर शेतकरी संघटनांना 15 दिवस खाजगी आणि साखर कारखान्याचे गोडाऊन तपासण्याचे अधिकार द्या सगळी साखर बाहेर काढून दाखवतो. कुठे ठेवली आहे, कशी ठेवली आहे सगळं आम्हाला माहिती आहे. साखरच्या किमती वाढल्याने याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही. याचा सगळा फायदा फक्त व्यापाऱ्यांना होणार असल्याचा दावा देखील राजू शेट्टी यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना केला.
