Download App

शेअर बाजारात ‘आपटीबार’; गुंतवणूकदारांना धक्का, इराण-इस्रायल तणावाचा दिसला मोठा इफेक्ट!

  • Written By: Last Updated:

Stock Market Crash:  भारतीय शेअर बाजारात (Stock Market) पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे. इराण – इस्रायल (Iran and Israel) या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे भारतीय शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण झाली . शेअर बाजारात झालेल्या या घसरणीनंतर गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. 14 एप्रिल रोजी इराणने इस्रायलवर मोठा हल्ला केला होता ज्याचा परिणाम आता शेअर बाजारात दिसून येत आहे.

सोमवारी 10 च्या सुमारास सेन्सेक्स 727 अंकांच्या घसरणीसह 73,531.14 अंकांच्या पातळीवर व्यवहार होता. याच बरोबर आज निफ्टीमध्येही घसरण दिसून आली आहे. 10 च्या सुमारास 200 हून अधिक अंकांनी घसरल्यानंतर निफ्टी 22,315.20 च्या पातळीवर व्यवहार करत होता. मागील व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्स 74,244.90 आणि निफ्टी 22,519.40 च्या पातळीवर बंद झाले होते. आज सकाळी  टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि एनटीपीसीमध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली.

आज बाजार लाल चिन्हावर बंद झाला. सेन्सेक्स 845.12 अंकांनी घसरून 73,399.78 वर बंद झाला. तर निफ्टी 246.90 अंकांनी घसरल्यानंतर 22,272.50 स्तरावर बंद झाला.

गेल्या आठवड्यातही घसरण  

शुक्रवारी देखील भारतीय शेअर बाजारात घसरण झाली होती. शुक्रवारी सेन्सेक्स 793 अंकांनी घसरून 74,244.90 वर बंद झाला होता तर निफ्टीमध्ये 234.40 अंकांची घसरण दिसून आली होती. शुक्रवारी निफ्टी 22,519.40 अंकांवर बंद झाला होता.

या शेअर्समध्ये मोठी घसरण

शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये असणाऱ्या सन फार्मा, मारुती सुझुकी, पॉवर ग्रिड, टायटन, जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती.

तर आज सोमवारी निफ्टीमध्ये दिवसभरात श्रीरामफिन, विप्रो, आयसीआयसीआय बँक, बाजाजफायनान्स आणि बजाजफिन्सव्हीमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. तर सेन्सेक्समध्ये आयएफसीआय, जिंदवर्ल्ड, हिंदजिंक, केईसी आणि एनबीसीसी या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.

follow us