मुंबई : मी सांगितलं होतं झाडाला फळ येतील, पण उद्धव ठाकरेंनी झाडाशीच नातं तोडलं, अशी मिश्किल टिप्पणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून केली आहे. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी 33 कोटींच्या वृक्ष लागवड योजनेसंदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुनगंटीवारांनी टिप्पणी केलीय.
रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधवांनी केला केसीआर यांच्या पक्षात प्रवेश
मंत्री मुनगंटीवार म्हणाले, मी व्यक्तीगत पातळीवर उद्धव ठाकरेंना भेटून सांगायचो की, उद्धवजी झाडाला खत पाहिजे, तर उद्धव ठाकरेंनी ते खत न देता दुसरचं खत दिलं, असं केलं तर झाडाला फळ कशी येतील? असा सवालही सुधीर मुनगंटीवारांनी उपस्थित केला आहे.
मागील विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करत मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंवर भाजपकडून टीका-टिप्पण्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी मी व्यक्तीगत पातळीवर उद्धव ठाकरे यांना तीन वेळा भेटून सांगितलं असल्याचंही त्यांनी म्हटलयं.
रामदेव बाबा देणार 100 मुला-मुलींना संन्यास दीक्षा; योगी आदित्यनाथ राहणार उपस्थित
पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले, आमच्याकडे खताचीच बॅग होती, पण तुम्ही ज्याच्यावर दुसरं नाव होतं, ज्याने झाड जळणार होतं ते तुम्ही टाकलं असल्याचा टोलाही लगावला आहे. आत्ताही बिघलेलं नसून झाड वाढविण्यासाठी उद्धवजी पुन्हा एकदा शांतीने विचार करण्याचं आवाहन मुनगंटीवार यांनी केलं आहे.
तसेच यावेळी बोलताना त्यांनी झाडांपासून आपल्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळत असून तेही विनाखर्च, विनाटॅक्स. आपणही झाडांना काहीतरी देणं लागत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
दरम्यान, विधानपरिषदेत वृक्ष लागवड योजनेचा मुद्दा चांगलाच गाजला असून या योजनेच्या सुरुवातीपासूनच मी राज्यातील सर्व आमदारांना वृक्ष लागवड करण्यासाठी आवाहन करीत असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.