रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधवांनी केला केसीआर यांच्या पक्षात प्रवेश

रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधवांनी केला केसीआर यांच्या पक्षात प्रवेश

केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला आहे. हर्षवर्धन जाधव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. 2009 साली त्यांनी कन्नडमधून मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती व ते आमदार झाले होते.

हर्षवर्धन जाधव यांनी हैद्राबाद येथे जाऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. लवकरच चंद्रशेखर राव यांची छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभा घेणार असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले आहे.

Sanjay Raut यांना संसदीय गटनेते पदावरून हटवले; शिंदे-ठाकरे वादाचा नवा अंक

गेल्या काही वर्षात हर्षवर्धन जाधव अनेक वादग्रस्त विधानामुळे चर्चेत येतात. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई असलेले हर्षवर्धन जाधव मनसेचे आमदार होते. २००९ साली कन्नड मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते.पुढे त्यांनी मनसेची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला होता.

२०१४ साली शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले. पण २०१९ साली औरंगाबाद लोकसभेची निवडणूक लढवली आणि पराभव स्वीकारला. दरम्यान आपल्या नव्या पक्षाची स्थापना करून पुन्हा एकदा मनसेत प्रवेश केला. मध्यंतरी त्यांनी राजकीय निवृत्तीचीही घोषणा केली होती.

Women Maharashtra Kesari : सांगलीत आजपासून रंगणार पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा; क्रीडा वर्तुळात उत्सुकता शिगेला

दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. संजना जाधव या कन्नड मतदारसंघातून 2024 ची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. यासाठी त्यांनी तयारी देखील सुरु केली आहे. 2024 साली त्या आपले पती हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधातच निवडणून लढवू शकतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube