Women Maharashtra Kesari : सांगलीत आजपासून रंगणार पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा; क्रीडा वर्तुळात उत्सुकता शिगेला

Women Maharashtra Kesari : सांगलीत आजपासून रंगणार पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा; क्रीडा वर्तुळात उत्सुकता शिगेला

सांगली : महाराष्ट्रातील महिला कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी सांगलीत आजपासून पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. (First Women Maharashtra Kesari) २ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या आयोजनाचा पहिला मान हा सांगली शहराला मिळाला. (Women Maharashtra Kesari 2023) या स्पर्धेच्या विजेतेपदाचा पहिला बहुमान मिळवण्याकरिता राज्यातील महिला कुस्तीपटू जोरदार मेहनत घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (Maharashtra Kesari 2023) महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत १० वजनी गटासह खुल्या गटांतील कुस्तीपटू सहभागी असणार आहेत.

सांगलीत आजपासून पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात होत आहे. २ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ५०, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६८, ७२ आणि ७६ वजनी गटात ही स्पर्धा खेळवली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र केसरीसाठी ६५ वजनी गटातील महिला मल्ल किताबासाठी लढणार आहेत. या स्पर्धेत ४५ जिल्ह्याचे संघ सहभाग नोंदवणार आहेत. यावेळी महत्त्वाचा बद्दल म्हणजे या सर्व स्पर्धा या मॅट वरच खेळवण्यात येणार आहे.

IPL 2023 New Rules : काय सांगता! टॉसनंतर कॅप्टन घोषित करणार प्लेइंग-11, नक्की काय आहेत नियम ?

महाराष्ट्र केसरीला स्पर्धेला १९६१ साली सुरुवात करण्यात आली, तेव्हापासून महाराष्ट्र केसरीच्या विजेत्याला चांदीची गदा ही देण्यात येते. म्हणून या चादींच्या गदेला महाराष्ट्रात मान आहे, त्याला मोठा ऐतिहासिक वारसा देखील आहे. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव माजी खासदार अशोक मोहोळ यांनी त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी विजेत्यास गदा देण्याची परंपरा सुरू करण्यात आला. पुण्यात यंदा ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुण्याचा पैलवान शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडवर मात करत मानाची गदा जिंकली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube