Sanjay Raut यांना संसदीय गटनेते पदावरून हटवले; शिंदे-ठाकरे वादाचा नवा अंक

  • Written By: Published:
Sanjay Raut यांना संसदीय गटनेते पदावरून हटवले; शिंदे-ठाकरे वादाचा नवा अंक

राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सत्ताबदल झाला पण अजूनही अनेक ठिकाणी असलेल्या नेमणुकीवरून पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गट समोरासमोर येणार आहे. त्यातच आज एक नवा वाद समोर आला आहे. आज शिंदे गटाकडून संजय राऊत यांना शिवसेना संसदीय गटनेतेपदावरून मुख्य नेते पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

संजय राऊत यांना गटनेते पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटाचे खासदार  राहुल शेवाळे यांनी संसदीय सचिवालयाला तसे पत्र पाठवले आहे.

उद्धव ठाकरेंना लोक सोडून गेले, राज ठाकरेंच काय ? ते १३ आमदार कुठे आहेत?

गजानन कीर्तिकर नवे नेते

राहुल शेवाळे यांनी पाठवलेल्या पत्रानुसार संजय राऊत यांना हटवून त्यांच्या जागी खासदार गजानन किर्तीकर शिवसेना संसदीय दलाचे मुख्य नेते म्हणून नेमणूक करण्यास सांगितले आहे. आज गजानन किर्तीकर शिवसेना संसदीय पार्टीचे मुख्य नेते म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube