चर्चा तर होणारच ! उद्धव ठाकरे-फडणवीसांची विधानभवनात एकत्र एन्ट्री

चर्चा तर होणारच ! उद्धव ठाकरे-फडणवीसांची विधानभवनात एकत्र एन्ट्री

मुंबई : राजकारणात कायमच एकमेकांना टीकेचे लक्ष्य करणारे, एकमेकांविरोधात राजकीय डावपेच खेळणारे दोन दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज चक्क एकत्र विधानभवनात दाखल झाले. या दोन्ही नेत्यांची एन्ट्री इतकी खास होती की येथे उपस्थित सर्वांच्याच भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते अगही हसतमुखाने विधानभवनात दाखल झाले. त्यांच्याबरोबर आदित्य ठाकरे सुद्धा दिसत होते.

वाचा : तुला मुख्यमंत्री व्हायचे हो पण, माझे..; राज ठाकरेंनी सांगितला उद्धव ठाकरेंचा किस्सा 

सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. 25 मार्च हा अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनात विरोधकांनी सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. आज विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव  देखील येणार आहे.

तसे पाहिले तर आधी शिवसेना आणि भाजपा युती होती. 2019 च्या निवडणुकाही दोन्ही पक्षांनी एकत्र लढल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांतील युती संपुष्टात आली. त्यानंतर राज्यात शिवसेनेच्या मदतीने महाविकास आघाडीचे सरकार आले.

धक्कादायक ! अनिक्षाकडून अमृता फडणवीसांचा पुणे-मुंबई पाठलाग

यानंतर मात्र उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तणाव निर्माण झाला. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नसायचे. त्यामुळे दोन्ही नेत्यांत दुरावाही निर्माण झाला. त्यानंतर जून 2022 मध्ये मात्र एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह बंडखोरी करत भाजपाच्या मदतीने महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार केले. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांत टीकेचा सूर अधिक तीव्र झाल्याचे पहायला मिळाले.

त्यानंतर आज मात्र विधानभवनाच्या परिसरात एक सुखद चित्र पाहण्यास मिळाले. राजकारणात एकमेकांवर कितीही टीका करत असले तरी असे काही प्रसंग असतात ज्यावेळी विरोधी नेते एकत्र पाहण्यास  मिळतात. आज विधिमंडळात असेच घडले. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांची एकत्र एन्ट्री झाल्याने सगळ्यांच्या नजरा या दोन्ही नेत्यांवर खिळल्या. सभागृहात प्रवेश करेपर्यंत दोघेही एकमेकांशी चर्चा करत असल्याचेही पाहण्यास मिळाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube