महायुतीमध्ये कुठलंही कोल्ड वॉर नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिलं आहे. दरम्यान, मुंबईत आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी काळात राष्ट्रवादीचे मंत्री राज्यभर दौरा करणार असून जनता भरवणार असल्याची चर्चा झाल्याची माहिती सुनिल तटकरेंनी दिली आहे.
‘अमित शाहांच्या खोट्या बोलण्यानं भाजपाचेच नुकसान’; शिंदे गटाच्या नेत्यानेच दिला घरचा आहेर
तटकरे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वार रुममध्ये प्रकल्प कामांचा आढावा घेत असतात. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही कामाचा आढावा घेतात. अजित पवारांची विशिष्ट कार्यपद्धती आहे. ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सूचीचे प्रकल्प कामांबद्दल आढावा घेत असतात. यामध्ये काहीच गैर नाही. महायुतीमध्ये कुठल्याची स्वरुपाचं कोल्ड वार नसून वाररुमच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न गतिमान पद्धतीने सोडवण्यावर आमचं लक्ष केंद्रीत असल्याचं तटकरेंनी स्पष्ट केलं आहे.
पालकमंत्रीपदावरून दोन दादांमध्ये समेट?; ध्वजारोहणासाठी अजितदादा कोल्हापुरात जाणार
तसेच स्वांतत्र्यदिनी झेंडावंदनाची यादी जाहीर करण्यात आलीय. या यादीवरुन अनेक नेत्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचं बोललं जातंय. यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, झेंडावंदनाची यादी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. त्यामुळे नेत्यांमध्ये कोणतीही नाराजी किंवा धुसफूस असं काहीही झालेलं नसल्याचं तटकरेंनी ठामपणे सांगितलं आहे.
घरा बाहेर गारा पडत होत्या म्हणून… ‘जवान’ साठी केलेल्या टक्कलवर शाहरूखचं मजेशीर उत्तर
दरम्यान, आजच्या बैठकीत राष्ट्रवादीचं संघटन, ध्येय धोरणे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी भवनात मंत्र्यांनी जनता दरबार भरवण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात मंत्र्यांचा जनता भरवला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबईत राष्ट्रवादीचे दोन कार्यालय असतील तर दोन झेंडावंदन होणारच आहे. या राष्ट्रवादीच्या झेंडावंदन कार्यक्रमाला मी स्वत: देखील उपस्थित राहणार असल्याचं तटकरेंनी स्पष्ट केलं आहे.