Sujat Ambedkars Sensational claim about Praniti Shinde join BJP she deals with Devendra Fadanvis : गेल्या काही महिन्यांपूर्वी सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे या भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र त्यानंतर या चर्चांना विराम मिळाला होता. त्यानंतर आता पुन्हा प्रणिती शिंदेंच्या भाजप प्रवेशाबाबत सुजात आंबेडकर यांनी जाहीर सभेमध्ये खळबळजनक दावा केला आहे.
नेमकं काय म्हणाले सुजात आंबेडकर?
आपल्या विरोधात भाजप आहे हे सर्वांना माहिती आहे. कारण आरएसएस निवडणूक लढवत नाही नाहीतर तिकडेही त्यांना हारवलं असतं. पण दुसरीकडेही काँग्रेस नाही तर भाजपच आहे. कारण प्रणिती शिंदे या भाजपसाठी काम करतात. शिंदे या निवडणुकी अगोदरच भाजपमध्ये जाणार होत्या. पण त्यांना फडणवीसांनी सांगितलं की, थांबा तीन महत्त्वाच्या निवडणुका आहेत. तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा सेटींग करून भाजपचे उमेदवार निवडून आणा. मग त्या भाजपमध्ये जातील अशी प्रणितीताई आणि फडणवीसांची डील झाली आहे.
ट्रम्प यांनी पुन्हा उपसले टॅरिफचे हत्यार! भारताला थेट सार्वजनिक भाषणात दिली करवाढीची धमकी
