Sujay Vikhe Exclusive Interview : राजकारणात डाव टाकता आला पाहिजे, नाहीतर…; स्वभावावर सुजय विखे स्पष्टच म्हणाले

Sujay Vikhe Exclusive Interview : अहिल्यानगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी लेट्सअप मराठीला दिलेल्या

Sujay Vikhe

Sujay Vikhe

Sujay Vikhe Exclusive Interview : अहिल्यानगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी लेट्सअप मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी जिल्हा बँक निवडणुकीसाठी नेमक्या काय राजकीय घडामोडी झाल्या? बाळासाहेब थोरात यांच्यासोबत युती कशी झाली? याबाबत मोठा खुलासा केला आहे. तसेच त्यांनी या मुलाखतीमध्ये आपल्या स्वभावाबद्दल बोलताना माझा दोष आहे मी अन्यायविरोधत लढतो असं म्हटलं आहे.

खासदार (Sujay Vikhe) होण्याच्या अगोदर आणि खासदार असताना एक आक्रमक तरुण राजकारणी अशी तुमची प्रतिमा होती मात्र जिल्हा बँकेच्या राजकारणात तुमचा एक वेगळा स्वभाव बदला या प्रश्नावर बोलताना सुजय विखे (Sujay Vikhe Exclusive Interview) म्हणाले की, माझा दोष आहे. पत्रकार म्हणत आहे की, सुजय विखेंचा स्वभाव पराभवानंतर बदलला आहे पण एक व्यक्ती 45 वर्षात येऊन बदलू शकत नाही पण पाहण्याचा दृष्टिकोण बदलला आहे. अन्यायविरोधात लढायची माझी मानसिकता आहे आणि अन्याय न सहन करणाऱ्या माणसाचा स्वभाव आक्रमक असू शकतो तो बदलला जाऊ शकत नाही. लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोण असतो एखाद्या नेत्याप्रती. 2014 मध्ये लोकांना माझ्याबद्दल एक विषेश प्रेम वाटलं. 2019 मध्ये माझ्याविरोधात किंवा पक्षाविरोधात लाट असेल. मी कोणाला दोष देत नाही. माझ्या काही चुका असतील 100 टक्के असतील म्हणून मी पराभूत झालो. मात्र आज दोन- तीन वर्षांनंतर लोकांनाच हे जाणवलं की, सुजय विखे हा खासदार म्हणून योग्य व्यक्ती होता आणि मग लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोण बदलला आणि तो बदलल्याचा परिणाम की, जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी भाजपची सत्ता मला आणता आली असं सुजय विखे म्हणाले.

तसेच, राजकारणात एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. वेळ ओळखता आली पाहिजे आणि डाव टाकता आला पाहिजे. जर तुम्ही मीच सगळ्यात मोठा या भूमिकेत गेलात, तर तुम्ही काहीही मिळवू शकत नाही. माझ्या आयुष्यात मला एकदा गुलाल खेळता आला नाही. ती संधी पुन्हा माझ्या आयुष्यात येऊ नये, यासाठीच मी प्रयत्न करतो, असंही यावेळी सुजय विखे म्हणाले.

तुम्ही मुख्यमंत्री होणार का? सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया ; 2014 पासून मी …

Exit mobile version