जनतेच्या मनातील खासदार… नगर शहरात झळकलेले सुजय विखेंचे बॅनर पुन्हा चर्चेत
Sujay Vikhe यांचे नाव खासदारकीसाठी सातत्याने चर्चेत असते. मात्र शहरातील एका बॅनर बाजीमुळे विखे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
Sujay Vikhe’s banners, spotted in Ahilyanagar city topic of discussion once again : परखड वक्तव्य असो किंवा विरोधकांवर आपल्याच स्टाईल मध्ये त्यांचा समाचार घेणे यामुळे माजी खासदार तसेच अहिल्यानगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुजय विखे यांचे नाव सातत्याने चर्चेत असते. मात्र शहरातील एका बॅनर बाजी मुळे विखे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जनतेच्या मनातील खासदार अशा आशयाचा उल्लेख असलेला एक बॅनर सध्या नगर शहरातील मध्यवर्तीय भागात झळकल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
…तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय! रोहित पवारांच्या मोर्च्याला पक्षाचा पाठिंबा नाहीच
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुजय विखे व राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात थेट लढत झाली व यामध्ये लंके यांनी बाजी मारली व खासदार झाले मात्र पराभवानंतर देखील सुजय विखे हे सातत्याने चर्चेत राहिले. निवडजुकीमधील अपयशानंतर सुजय यांनी जनतेमध्ये जात थेट भेटीगाठी घेत त्यांची कामे मार्गी लावून देण्याचा सपाटा लावला तसेच वेळोवेळी आपल्या विरोधकांवर शाब्दिक टीका देखील त्यांनी केली व येणाऱ्या काळात आपण खासदार होऊ असे वक्तव्य देखील त्यांनी केले होते.
शरद पवार निवृत्ती जाहीर करणार का? सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांनी पाय ठेवला बिनविरोध संचालक म्हणून त्यांची निवड झाली व त्यापाठोपाठ जिल्हा बँकेचे अध्यक्षपदी देखील त्यांचीच निवड झाल्याने कार्यकर्तांमध्ये देखील उत्साह पाहायला मिळाला. दरम्यान सुजय विखे यांचा आज वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांकडून नगर शहरातील दिल्लीगेट परिसरात एक अनोखा बॅनर झळकवण्यात आला
जनतेच्या मनातील खासदार
शहरातील दिल्लीगेट येथील परिसरात झळकवण्यत आलेल्या बोर्डवर जनतेच्या मनातील खासदार असा उल्लेख सुजय विखे यांच्या बाबतीत करण्यात आला आहे. या फलकावर नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचा देखील फोटो लावण्यात आला आहे. दरम्यान २०२९ च्या लोकसभेला सुजय विखे हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात दिसतील अशा चर्चांना उधाण आले आहे.