गोड बोलणाऱ्यांना घरात बसवा! अजित पवारांच्या शैलीत सुजय विखेंचा थेट हल्ला

बैठकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रशासन, ठेकेदार आणि नागरिकांना उद्देशून स्पष्ट, थेट आणि रोखठोक भूमिका मांडली

Untitled Design (372)

Untitled Design (372)

Sujay Vikhe’s direct attack in Ajit Pawar’s style : राहुरीमध्ये नगर-मनमाड राज्य महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत आयोजित बैठकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रशासन, ठेकेदार आणि नागरिकांना उद्देशून शप्ष्ट, थेट आणि रोखठोक भूमिका मांडली. ‘आम्ही कधीही पदाचा अहंकार बाळगलेला नाही. जनतेसाठी काम करताना सरळपणा आणि प्रामाणिकपणा महत्वाचा असतो,’ असे सांगत त्यांनी सर्व घटकांना जबाबदारीची जाणीव करून दिली.

राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर-मनमाड महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून 20 फेब्रुवारीपर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांना संयम ठेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. महामार्गालगतच्या बंदिस्त साईड गटारापासून चार मीटरपर्यंत असलेली अतिक्रमणे संबंधित व्यापारी आणि नागरिकांनी स्वेच्छेने हटवावीत, अन्यथा प्रशासनामार्फत कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला.

सध्या राहुरी शहर हद्दीत साईड गटाराचे काम सुरू आहे. गटारी रस्त्याच्या पातळीपेक्षा उंच झाल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी व्यापाऱ्यांकडून मांडण्यात आल्या होत्या. या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी ज्ञानेश्वर चित्र मंदिर येथे बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीदरम्यान व्यापारी व नागरिकांनी पाणी निचरा, रस्त्याची उंची, दुकानांपर्यंत पोहोच, वाहतूक आदी अडचणी मोकळेपणाने मांडल्या.

दहा पक्ष बदलणारा मला भाजपमध्ये जाण्याचा सल्ला देतोय; जयंत पाटील यांचे सदाभाऊ खोत यांना प्रत्युत्तर

“काम पूर्ण होईपर्यंत थोडा त्रास सहन करावा लागेल; मात्र त्यानंतर नगर-मनमाड महामार्गाचा प्रश्न कायमचा सुटेल,” असा विश्वास डॉ. विखे यांनी व्यक्त केला. विकासकामांना अडथळे न आणता सर्वांनी पुढाकार घेऊन अतिक्रमणे हटवावीत, असे आवाहनही त्यांनी केले. उपस्थित नागरिकांच्या प्रत्येक समस्येची गंभीर दखल घेत डॉ. सुजय विखे यांनी ठेकेदार व प्रशासनाला जागेवरच स्पष्ट आदेश दिले. गैरसमज दूर करून कामाला गती देण्याचे निर्देश देत त्यांनी वेळेत काम पूर्ण होण्यावर भर दिला.

यावेळी ते म्हणाले, “मी पदाचा नव्हे, कामाचा माणूस आहे. माजी खासदार असलो तरी अनावश्यक गोंधळ निर्माण करू नका. रखडलेली व वाढीव रस्त्यांची कामे वरिष्ठ पातळीवरून मंजूर करून आणण्याची जबाबदारी मी घेतो. ठेकेदाराला अडथळे आले तर काम थांबेल आणि त्याची किंमत आपल्यालाच मोजावी लागेल. भविष्यातील पिढीने आपल्याला दोष देऊ नये, यासाठी हे काम पूर्ण होऊ द्या.”

अनेक तांत्रिक अडचणी असूनही काम सुरू असल्याचे स्पष्ट करत त्यांनी आंदोलन किंवा वाद टाळून सर्वांनी एकत्र सहकार्य करण्याचे आवाहन केले. श्रेय कुणीही घ्यावे, मात्र काम वेळेत पूर्ण होणे हेच महत्त्वाचे असल्याचे सांगत पुढील एका महिन्यात शहरातील काम पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. डॉ. विखे पाटील यांच्या शिस्तबद्ध आणि निर्णयक्षम भूमिकेमुळे बैठकीला आलेल्या अनेकांना दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांवर ठाम निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाची आठवण झाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली.

Exit mobile version