राष्ट्रवादीकडे अर्थखातं येणार? मंत्रिबदलाच्या हालचालींना वेग; सुनेत्रा पवार, पार्थ पवारांची अमित शाहांसोबत बैठक

Sunetra Pawar Meeting with Amit Shah : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मंत्रिमंडळातील बदलांच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय

Sunetra Pawar Meeting With Amit Shah

Sunetra Pawar Meeting With Amit Shah

Sunetra Pawar Meeting with Amit Shah : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मंत्रिमंडळातील बदलांच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी खासदार पार्थ पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची 21 ऑक्टोबर रोजी दिल्लीत भेट घेतली. अमित शाहांसोबतच्या या बैठकीत राष्ट्रवादीच्या वाट्याचं अर्थखातं मिळण्यासोबतच मंत्रिमंडळातील संभाव्य बदलांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये (Mahayuti) खातेवाटप आणि मंत्रिमंडळातील जबाबदाऱ्यांबाबत या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वाट्याला असलेले अर्थखाते मिळण्याचा मुद्दा आणि पक्षातील संभाव्य मंत्रिबदल यावर चर्चा झाल्याचे समजते. सुनेत्रा पवारांना भाजप (BJP) अर्थमंत्रीपद देणार नाही, असे रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) स्वतःकडे ठेवलेल्या अर्थमंत्रीपदाबाबत चर्चांना उधाण आले. मात्र, अमित शाहांसोबत (Amit Shah) झालेल्या या चर्चेत नेमके कोणते निर्णय झाले किंवा कोणत्या मंत्र्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल होणार आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मुंबई जगातील तिसरे सर्वाधिक प्रदूषित शहर! IQAir च्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अमित शाह यांच्यासोबत झालेल्या या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य बदलांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या चर्चेनंतर पक्षाच्या मंत्रिमंडळातील भूमिकेबाबत काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version