Sunetra Pawar On NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर धोका.., सुनेत्रा पवारांनी वरिष्ठ नेत्यांकडे स्पष्ट केली भूमिका

Sunetra Pawar On NCP Merger : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून

Sunetra Pawar On NCP Merger

Sunetra Pawar On NCP Merger

Sunetra Pawar On NCP Merger : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोराने सुरु आहे. विलीनीकरणासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या आपल्या आमदारांसोबत चर्चा देखील करत असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे आता समोर आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विलीनीकरणाबाबत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको अन्यथा भविष्यात आमच्या अस्तित्वातचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आमची सध्या तरी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला मान्यता नाही मात्र दुसऱ्या राष्ट्रवादीबाबत आपण काही वेगळा विचार करत असाल किंवा दुसरी राष्ट्रवादी महायुतीचा (Mahayuti) स्वतंत्र घटकपक्ष म्हणून एनडीएमध्ये सहभागी होणार असेल तर याला आमचा विरोध नसेल असं सुनेत्रा पवार यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं असल्याची माहिती समोर आली आहे.

तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात सुरु असणाऱ्या चर्चांनुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या कार्यालयातून पक्षाच्या आमदारांना फोन करण्यात येत आहे. विलीनीकरणावर आणि बदलत्या राजकीय समीकरणावर आमदारांची भूमिका जाणून घेतली जात आहे.

40 ते 45 मिनिटं विलीनीकरणावर चर्चा – छगन भुजबळ

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील विलीनीकरणाबाबत मोठा गोप्यस्फोट केला आहे. आपल्या उपस्थितीत 40  ते 45  मिनिटे अजित पवार आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यात विलीनीकरणावर चर्चा झाली होती असं छगन भुजबळ यांनी दावा केला आहे. मी आजारी असताना जयंत पाटील आणि अजित पवार विचारपूस करण्यासाठी आले होते. त्या भेटीदरम्यान मी स्वत: पुढाकार घेऊन अजित पवार चांगले नेतृत्व करत असून सर्वांनी पुन्हा एकत्र यायला हवे अशी भूमिका मांडली होती.

घराचं कर्ज फेडण्यासाठी EPF मधून पैसे काढता येतात? जाणून घ्या नियम –

या प्रस्तावार जयंत पाटील म्हणाले होते की, तुम्ही सध्या सत्तेत एनडीएसोबत आहात त्यामुळे तुमच्या मित्रपक्षांना हे एकत्रीकरण मान्य होईल का? यावर अजित पवार आणि शरद पवार हे चर्चा करुन मार्ग काढतील असं मी म्हणालो होतो असा दावा छगन भुजबळांनी केला आहे.

Exit mobile version