बारामती दादांसाठी आईसारखी होती; उमेदवारी दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवारांनी केलं मन मोकळं

अजितदादांना आपण प्रचंड मताधिक्क्याने निवडून दिलं आहे. दादांनी प्रत्येकवेळी स्वत:च्या मताधिक्क्याचे विक्रम मोडीत काढले.

News Photo   2026 04 06T144119.259

बारामती दादांसाठी आईसारखी होती; उमेदवारी दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवारांनी केलं मन मोकळं

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार (Pawar) आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा मेळावा होत आहे. दोन महिन्यापूर्वी आपण सर्वांनी आपल्या लाडक्या नेत्याला गमावलं. आज त्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.

बारामतीत ही पोटनिवडणूक होईल. दादा अजूनही आपल्यात नाहीत असं मला वाटतं नाही. दादाचं जाणं ही फक्त माझी, माझ्या कुटुंबाची व्यक्तीगत हानी नाही, तर बारामती, देश, महाराष्ट्राची हानी झाली असं म्हटल्यास वावग ठरणार नाही. तसंच, बारामती दादांसाठी आईसारखी होती. बारामतीचा प्रत्येक नागरिक दादांसाठी खरा पांडुरंग होता. बारामतीकरांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा हाच दादाचा विश्वास, आधार होता. बारामती म्हणजे दादांचा श्वास होता. म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास बारामतीच्या मातीत विसावला हे बोलताना सुनेत्रा पवार यांचा कंठ दाटून आला, त्यांचे डोळे पाणवले. बारामतीतल्या प्रत्येक झाडात, पानात, फुलात, रस्त्याला, शाळेत, नदी, इमारतीत दादांचा स्पर्श आहे असंही त्या म्हणाल्या.

EXCLUSIVE : विखे-चव्हाणांची भेट अन् फडणवीसांशी चर्चा; राहुरी निवडणुकीतून तनपुरेंची माघार?

पानं, फुलं आज दादाच्या आठवणीने रडत आहेत. बारामतीकरांच्या विकासासाठी आदरणीय दादाचं स्वप्न साकार करण्यासाठी मी माझं दु:ख तळ घरात कोंडलं. अत्यंत धीराने आपल्या सर्वांसाठी बाहेर पडले. मात्र मला हा धीर तुम्हा बारमतीकरांकडे बघून आला आहे असं सुनेत्रा पवार बोलल्या. त्याचबरोबर तुमचं प्रेम, पाठिंबा, तुमची साथ हीच माझी शक्ती आहे. गेल्या 35-36 वर्षात आदरणीय अजितदादांना आपण प्रचंड मताधिक्क्याने निवडून दिलं आहे. दादांनी प्रत्येकवेळी स्वत:च्या मताधिक्क्याचे विक्रम मोडीत काढले. तुमच्या मतांचा बोजा म्हणून मी २४ तास काम करतो असं दादा नेहमी म्हणायचे. दादाच्या माघरी ही पहिलीच निवडणूक आहे. ही केवळ निवडणूक नाही, दादांना श्रद्धांजली अपर्ण करण्याची प्रत्येक बारामतीकराला संधी आहे असंही सुनेत्रा पवार बोलल्या.

आदरणीय पवारसाहेबांनी विकासाचा दृष्टीकोन दिला. दादांनी आपल्या कष्टाने त्यात रंग भरले, कोंदण भरलं. बारामतीला जागतिक दर्जाकडे नेलं. मी तुम्हाला वचन देते बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही. बारामती हा जगातला सर्वात विकसित तालुका बनवणं हे दादांच फक्त स्वप्न नव्हतं तर ही दादांची जिद्द, ध्यास होता” असं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. “बारामती जागतिक दर्जाचं शहर बनण्याचं स्वप्न पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर असताना नियतीने दादांना आपल्यातून नेलं. त्यांना लोक कल्याणाची खरी तळमळ होते. जो पर्यंत जिवंत आहे, तो पर्यंत बारामतीकरांची सेवा करत राहीन हे दादांनी आपले शब्द खरे करुन दाखवले. दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही” असं सुनेत्रा पवार बोलल्या.

Exit mobile version