Devendra Fadnavis on Bullock Cart Racing : गेल्या बारा वर्षापासून सुरु असलेल्या कायदेशीर लढाईला अखेर यश आले आहे. राज्यातील बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. राज्य सरकारचा महाराष्ट्रातला बैलगाडा शर्यतीबद्दलचा कायदा वैध ठरवण्यात आला आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी मुख्यमंत्री असताना कायदा तयार केला होता. तो कायदा केल्यानंतर बैलगाडा शर्यत सुरु झाली, असे त्यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी मुख्यमंत्री असताना बैलगाडा शर्यतीसाठी कायदा तयार केला होता. त्यामुळे बैलगाडा शर्यत सुरु झाली. परंतु, याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. बैल हा धावणारा प्राणी नाही, असं याचिकाकर्यांनी सांगितलं. परिणामी कायद्याला स्थगिती मिळाली होती, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Karnataka CM News : सिद्धारामय्या ठरले ‘किंग’; शिवकुमारांच्या हातून तेलही गेलं अन् तुपही गेलं
बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु व्हावी यासाठी आम्ही एक समिती स्थापन करुन एक रिपोर्ट तयार केला की बैल हा धावणारा प्राणी आहे. मी मुख्यमंत्री असताना तो आम्ही रिपोर्ट तयार केला तो रिपोर्ट आम्ही सादर केला. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी महाराष्ट्राच्या रनिंग अबिलिटी ऑफ बुल म्हणजे बैल हा धावणारा प्राणी आहे. हा आमचा रिपोर्ट त्या ठिकाणी सादर केला आणि सांगितलं की हा कायदा आहे. कारण या कायद्यामध्ये सर्व काळजी घेतली आहे. त्यामुळे कायदा कुठेही प्राण्यांवर अन्याय करणारा कायदा नाही. आज जो निर्णय आला आहे त्याच्यामध्ये आम्ही केलेला कायदा हा सर्वार्थाने कॉन्सिट्यूशनल आहे हा सर्वार्थाने संवैधानिक आहे.
सुप्रीम कोर्टाचा बैलगाडा शर्यतीवर निकाल.
1. बैलगाडा शर्यत संस्कृतीचा भाग
2. विधीमंडळाचा कायदा वैध
3. विधीमंडळाच्या अधिकारात कोर्ट हस्तक्षेप करणार नाही.
4. बैलांचा छळ न होण्यासाठी दंडाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात केली.
5. बैल धावणारा प्राणी आहे, असा महाराष्ट्र सरकारचा अहवाल महत्त्वपूर्ण.