Karnataka CM News : सिद्धरामय्या मुख्यमंत्री तर, शिवकुमार एकमेव उपमुख्यमंत्री होणार

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 18T124926.540

Siddaramaiah will be the Chief Minister of Karnataka :  कर्नाटकात अनेक दिवसांच्या विचारमंथनानंतर मुख्यमंत्री कोण होणार याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता काँग्रेसने कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे असणार आहे. काँग्रेसने त्यांच्या शपथविधी सोहळ्याचा दिवसही निश्चित केला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, 20 मे रोजी दुपारी 12.30 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील इतर मंत्रीही शपथ घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केसी वेणुगोपाल पुढे म्हणाले की, सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील, तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील. 13 मे रोजी पक्षाला बहुमत मिळाले, 14 मे रोजी सीएलपीची बैठक झाली, ज्यामध्ये काँग्रेस पक्षाने निरीक्षकांची नियुक्ती केली. ते म्हणाले की, काँग्रेस हा लोकशाहीवादी पक्ष आहे. आमचा एकमतावर विश्वास आहे, हुकूमशाहीवर नाही. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार हे दोघेही पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

यानंतर डीके शिवकुमार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कर्नाटकचे सुरक्षित भविष्य आणि लोकांचे कल्याण हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि आम्ही याची हमी देण्यासाठी एकजूट आहोत, असे शिवकुमार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

दरम्यान, यावेळी केसी वेणुगोपाल यांनी डीके शिवकुमार हे एकमेव उपमुख्यमंत्री असतील असे सांगितले आहे. डीके शिवकुमार यांचे नाव देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पुढे होते. कर्नाटकच्या विजयामध्ये शिवकुमार यांचा सिंहाचा वाटा असल्याचे बोलले जात होते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून कर्नाटकमध्ये चांगली कामगिरी करुन दाखवली. यानंतर त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार असे बोलले जात होते. पण आता ते उपमुख्यमंत्री राहणार असे काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले आहे. आता शिवकुमार यांच्याकडे कोणते महत्वाचे खाते दिले जाते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us