Download App

…तर पाहू काय करायचं ते, सुप्रिया सुळेंना आझाद मैदानात आंदोलकांचा घेराव, जरांगे पाटील काय म्हणाले?

मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे आझाद मैदानातून बाहेर पडत होत्या. यावेळी त्यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला.

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange on Supriya Sule Attack : मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील (Sule) मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर जात जरांगे पाटलांच्या तब्ब्येतीची विचारपूस केली. सुप्रिया सुळे यांना घेरण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांकडून करण्यात आला. यावर आता जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे आझाद मैदानातून बाहेर पडत होत्या. यावेळी त्यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला. यावेळी काही आंदोलकांनी खासदार शरद पवार यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली. एका आंदोलकाने तर शरद पवार यांनी मराठ्यांचे वाटोळे केले आहे, असा आरोप केला. काही आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्या कारचा पाठलाग केला. तसंच, सुळे यांच्या कारवर काही लोकांनी बॉटलही फेकल्या होत्या.

Maratha Reservation : जरांगेंनी ओबीसी;तून आरक्षण मागितलं; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला न्यायालयाचा दाखला

या घटनेवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, कोणताही नेता आला तर त्यांना त्रास देऊ नका, तो आपला दुश्मन जरी असला तरी त्याला सन्मान द्यायला शिका. अन्यथा, आपल्याकडे नेते यायला भेतील. नेते आल्यावर तुम्ही गोंधळ घालत असाल तर तुमच्याकडे कोणीही येणार नाही. जोपर्यंत सहन होत आहे तोपर्यंत नेत्यांचा सन्मान करा. ज्यावेळेस असं वाटेल की, आरक्षण भेटत नाही, त्यावेळेस पाहू काय करायचं आहे ते.

कोणत्याही पक्षाचा नेता आला तर त्याला माघारी बोलू नका, त्याला सन्मानाने येऊद्या आणि सन्मानाने जाऊ द्या. गोंधळ घालणारे कोण आहेत ते पहावं लागेल. ते सरकारने पाठवलेले आहेत का? माझे लोक असं करत नाहीत, ते सरकारचेच असू शकतात. त्यांना दंगल घडवायची आहे. त्यामुळे पोरांनी सावध रहायला हवं असंही जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.

 

follow us

संबंधित बातम्या