Video : मोठी बातमी! मराठा आंदोलक सुप्रिया सुळेंविरोधात आक्रमक, जरांगेंच्या भेटीनंतर अडवला ताफा

Supriya Sule At Azad Maidan : मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Jarange) यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोनस्थळावरून मोठी बातमी समोर येत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील आझाद मैदानात दाऊन जरांगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
सुप्रिया सुळे आज आझाद मैदानावर मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. भेट झाल्यानंतर सुळे आझाद मैदानावरून त्यांच्या कारकडे निघाल्या होत्या. मात्र, मराठा आंदोलकांनी त्यांना घेरले आणि एक मराठा-लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. काही आंदोलकांनी तर खासदार शरद पवार यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली. या सर्व स्थितीमुळे जरांगे यांच्या आंदोलनाच्या परिसरात काही काळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, काही मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना वाट काढून दिली.
Breaking : उद्यापासून पाणी बंद! मनोज जरांगे पाटलांचा निर्णय; मराठा आरक्षणाची लढाई निर्णायक टप्प्यावर
मराठा आंदोलक आक्रमक होते. तेव्हा सुप्रिया सुळे मात्र शांत होत्या. त्यांनी प्रत्येक आंदोलकाला हसतमुखाने नमस्कार केला. तसंच, प्रत्येकाच्या हातात ता मिळवला. सर्वांनाच नमस्कार करून त्या नंतर कारमधून निघून गेल्या. नंतर आंदोलकांनी त्यांच्या कारचाही पाठलाग केला. त्यांच्या कारलाही आंदोलकांनी घेराव घातला आणि जोरदार घोषणाबाजी केली. या सर्व घडामोडीमुळे सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पण काही आंदोलकांनी भान राखून सुळे यांच्या कारला वाट करून दिली.
मनोज जरांगे वारंवार मराठा आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन करत आहेत. काहीही झालं तरी तुम्ही आक्रमक होऊ नका. शांत राहा. आपल्याला शांततेत आरक्षण घ्यायचे आहे, असे जरांगे आंदोलकांना सांगत आहेत. मात्र काही आंदोलक आक्रमक होताना दिसत असून कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस टीव्ही नाईन मराठीशी बोलताना म्हणाले की, असं करण योग्य नाही. कुठलेही नेते तिथे गेल्यानंतर त्यांना योग्य वागणूक मिळाली पाहिजे. घोषणाबाजी करणं बाटल्या फेकणं योग्य नाही. हुडदंगबाजी करुन काहीच मिळणार नाही. आम्ही मराठा समाजासाठी हिताचे निर्णय घेतले आहेत. मी आणि एकनाथ शिंदेंनी आरक्षण दिले. मराठा समाजाचे लोक आरक्षणाचा लाभ घेत आहे असं फडणवीस म्हणाले आहे.
सुप्रिया सुळे आज आझाद मैदानावर मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. भेट झाल्यानंतर सुळे आझाद मैदानावरून त्यांच्या कारकडे निघाल्या होत्या. मात्र, मराठा आंदोलकांनी त्यांना घेरले आणि एक मराठा-लाख मराठा अशी घोषणाबाजी केली.@PawarSpeaks @supriya_sule #MarathaReservation pic.twitter.com/J5bUb1inob
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 31, 2025