Download App

बीड पुन्हा पेटले! थरकाप उडवणाऱ्या हत्या-आत्महत्यांची मालिका; सुप्रिया सुळे अमित शाहंना भेटणार

Supriya Sule यांनी आपण बीडच्या मुद्द्यावर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार असल्याचं सांगितलं आहे.

Supriya Sule will Meet Amit Shah on Beed Crime : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये बीड जिल्हा हा संतोष देशमुख हत्या प्रकरण त्याचबरोबर इतरही राज्यासह देश हादरवून टाकणाऱ्या घटनांनी चर्चेत आला आहे. यावरून राज्य सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी आपण बीडच्या मुद्द्यावर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार असल्याचं सांगितलं आहे.

फडणवीसही औरंगजेबाइतकेच क्रूर शासक, दोघांचाही कारभार एकसारखा…हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुळे म्हणाल्या की,राज्यातील कृषी खात भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे. हे सुरेश धस, अंजली दमानिया, संदिप क्षीरसागर आणि बजरंग सोनावणे हे देखील म्हणत आहेत. या संदर्भात मी देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना भेटले आहे. त्यांनी मला शब्द दिला आहे की, मी याची चौकशी लावेन. त्याचबरोबर मी त्यांना परत एकदा त्याची आठवणही करून दिली की, त्यांनी महाराष्ट्राच्या शेतीवर जातीने लक्ष घालावं.

धक्कादायक! नाईट क्लबमध्ये लाईव्ह शो दरम्यान भीषण आग; 51 जणांचा मृत्यू 100 हून अधिक जखमी

त्याचबरोबर मी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना देखील मी बीड संदर्भात गेल्या वेळी भेट घेतली होती. त्यानंतर बीड संदर्भात वेगाने कारवाई झाली. मात्र हव्या त्या पद्धतीने ही कारवाई सुरू नसल्याने मा आता आणखी एकदा शाह यांची भेटीसाठी वेळ मागितली आहे. कारण संतोष देशमुख यांच्यासह इतरही राज्यासह देश हादरवून टाकणाऱ्या घटना बीडमध्ये घडत आहेत. त्यावर देखील त्यांनी लक्ष घालावं. सरकारला मार्गदर्शन करावं. त्याचबरोबर मी त्यांना ते सहकार मंत्री असल्याने त्यांना राज्यातील शेतकऱ्यांसह साखर उद्योगाबाबत देखील मी त्यांना लक्ष घालायला सांगणार आहे. अशी माहिती सुळे यांनी दिली.

follow us