धक्कादायक! नाईट क्लबमध्ये लाईव्ह शो दरम्यान भीषण आग; 51 जणांचा मृत्यू 100 हून अधिक जखमी

Massive fire during live show at nightclub; 51 dead, over 100 injured : उत्तर मॅसेडोनियातील पूर्वेकडील शहर कोकानीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी रविवारी मध्यरात्री एका नाइट क्लबमध्ये भीषण आग लगली. ज्यामध्ये तब्बल 51 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
मोठी बातमी! खुलताबादमध्ये पोलीस प्रशासन हायअलर्टवर, औरंगजेबाच्या कबरीजवळ जाण्यास…
मिळालेल्या माहितीनुसार ही आग मध्यरात्री 2:35 वाजता एका स्थानिक पॉप ग्रुपच्या कॉन्सर्टच्या दरम्यान लागली. याबाबत मंत्री पंचे तोशकोवस्की यांनी एक प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की,या क्लबमध्ये आग लागण्याचं कारण म्हणज या ठीकामी आलेल्या काही तरूणांनी आतिशबाजी केली ज्यामुळे क्लबच्या छताला आग लागली.
‘त्यांना’ देशाचा इतिहास तरी माहितेय का? औरंगजेबाच्या कबरीवरून विखेंचा रोहित पवारांना टोला
मात्र अद्याप ही आग नेमकी कशाने लागली याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या क्लबमधील आग लागल्याच्या दरम्यानचा अक व्हिडीओ समोर आला आहे. मात्र त्यामध्ये केवळ गोंधळ दिसत आहे. ज्यामध्ये नेमकी घटना कळत नाहीय. ही माग लागल्यानंतर प्रचंड गोंधळ उडाला. लोक जीव मुठीत धरून पळत होते.
एक दिवस शिवरायांच्या किल्ल्यांसाठी; शिवजयंती निमित्त निलेश लंकेंची मोहीम
दरम्यान या घटनेवर पंतप्रधान ह्रीस्टिजान मिकोस्की यांनी दु:ख व्यक्त केलं. त्यांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स वर लिहीलं की, मॅसेडोनियासाठी हा एक कठीण आणि अत्यंत दुखद दिवस आहे. इतक्या सगळ्या तरूणांचा जीव जाणे हे अत्यंत वेदनादायी आहे. तसेच त्यांच्या मित्र परिवारासाठी हा स्रवात मोठा धक्का मानला जात आहे.