‘त्यांना’ देशाचा इतिहास तरी माहितेय का? औरंगजेबाच्या कबरीवरून विखेंचा रोहित पवारांना टोला

  • Written By: Published:
‘त्यांना’ देशाचा इतिहास तरी माहितेय का? औरंगजेबाच्या कबरीवरून विखेंचा रोहित पवारांना टोला

Radhakrishna Vikhe Patil On Rohit Pawar : औरंगजेबाच्या कबरीवरून (Tomb of Aurangzeb) राज्यात आता चांगलेच वातावरण पेटले आहे. महायुतीमधील (Mahayuti) मंत्र्यांनीच औरंगजेबाची खुलताबाद येथील कबर हटविण्याची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार ( Rohit Pawar) यांनी कबर ठेवणे योग्य आहे. त्यामुळे इतिहास कळते असे म्हटले आहे. त्याला आता जलसपंदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

बीडमध्ये पुन्हा संतोष देशमुख पॅटर्न! 2 दिवस डांबून ठेवत क्रूरपणे मारहाण, 25 वर्षीय तरूणाची हत्या

मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, कबर हटविण्याबाबत लोकभावना आहोत. त्याचा आदर केला पाहिजे. इतिहास त्याला साक्षीदार आहे. आक्रमणामुळे हिंदू-देवतांची, देवळांची मोडतोड झाली. हिंदू संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. तो डाव होता. त्यामुळे औरंगजेबाची कबर राहणे हे अतशिय योग्य नाही ? हिंदुत्ववादी संघटनांनी भावना व्यक्त केल्या आहेत. लोकभावनाचा आदर केला पाहिजे.

गणपती बाप्पा आणि खंडोबाच्या चरणी माथा टेकवला, सुरजने केली ‘झापुक झुपूक’च्या प्रमोशनला सुरूवात

महाविकास आघाडीचे नेते सांगतायत की कबर ठेवणे योग्य आहे, त्यावर विखे म्हणाले, लोकभावना आणि इतिहासाचा आदर केला पाहिजे. पण कोण काय म्हणतो, याच्याकडे लक्ष्य देण्याची आवश्यकता नाही. आता पुढे गेले पाहिजे. विनाकारण भावनिक आधार देत लोकांना इतिहास माहिती पाहिजे, असे सांगतात. त्यांना तरी देशाचा इतिहास माहिती आहे का ? असा टोला विखे यांनी लगावला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना काय त्रास झाला आहे हे नाकारता येत नाही, अशा नराधमांना आपल्या इतिहासामध्ये जागाच नको आहे, असे विखे म्हणाले.

रोहित पवार काय म्हणाले होते ?

महाराष्ट्रामध्ये औरंगजेब 27 वर्षे राहिला आहे. त्यानंतर देखील त्याला महाराष्ट्रात राज्य करता आलेलं नाही. याचचं प्रतिक म्हणून खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबच्या कबरीला हात न लावणंच योग्य ठरेल. ही कबर (Rohit Pawar News) आज आपण उखडून टाकली तर भविष्यामध्ये लोक गडबड करतील, त्यामुळे कबरीला हात न लावण्याचं आवाहन रोहित पवारांनी केलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube