एक दिवस शिवरायांच्या किल्ल्यांसाठी; शिवजयंती निमित्त निलेश लंकेंची मोहीम

One day for Chhatrapati Shivaji Maharaj’s forts Nilesh Lanka’s campaign on Shiv Jayanti : ‘महिन्यातील एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासाठी, महाराजांच्या स्वराज्यासाठी’ अशी टॅग लाईन घेऊन खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे सहयाद्रीच्या कुशीतील असणारे गड किल्ले संवर्धनाची मोहिम आज सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेची सुरवात खासदार नीलेश लंके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असणाऱ्या किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन सुरुवात केली आहे.
एज इज़ जस्ट नंबर म्हणत ग्लोबल स्टार अभिनेत्री छाया कदमांचा खास अंदाज! पाहा फोटो
राज्यातील धार्मिक एकता, अखंडता, बंधुत्व याला कुठेतरी बाधा पोहोचत असल्याची सध्या चर्चा आहे. अनेक नेते मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने जनतेसमोर मांडताना दिसत आहेत. अशावेळी खासदार निलेश लंके यांनी अठरापगड जातीच्या सर्व मावळ्यांना एकत्र करून आज किल्ले शिवनेरी येथे स्वच्छता मोहीम राबवली. विशेष म्हणजे अनेक मावळ्यांनी पवित्र रमजान महिन्यातील रोजा असताना देखील या सफाई मोहिमेत सहभाग घेतला. मोठ्या प्रमाणात मुस्लिम मावळे देखील या मोहिमेत सहभागी झाली होते.
बीडमध्ये पुन्हा संतोष देशमुख पॅटर्न! 2 दिवस डांबून ठेवत क्रूरपणे मारहाण, 25 वर्षीय तरूणाची हत्या
हा कोणताही राजकीय स्टंट नसून ही सर्व मावळ्यांनी एकत्र येऊन राबवली स्वच्छता मोहीम आहे. या स्वच्छता मोहिमेमागे कोणताही राजकीय हेतू नाही. ही स्वच्छता मोहीम कुणालाही उत्तर नाही किंवा कोणतीही राजकीय टीका टिपणी करण्यासाठी नाही. केवळ महाराजांचा समृद्ध इतिहास आणि वारसा जतन व्हावा आणि तो जनतेला कळवा हाच या स्वच्छता मोहिमेमागचा हेतू असल्याचे खासदार निलेश लंके यांनी यावेळी सांगितले.
या मोहिमेच्या माध्यमातून केवळ महाराजांच्या गड किल्ल्यांची स्वच्छताच नाही तर त्यांची डागडुजी, जतन आणि संवर्धन देखील केले जाणार असल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली. यासाठीचा लागणारा खर्च लोकवर्गणीतून केला जाईल. श्रमदान केले जाईल. त्यासोबतच पुरातत्व विभागाकडे देखील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधीची मागणी करणार असल्याचे निलेश लंके यांनी सांगितले. सोबतच पुढची स्वच्छता मोहीम ही 13 एप्रिल रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील धर्मवीर गडावर होणार असल्याचे खासदार निलेश लंके यांनी सांगितले.