एज इज़ जस्ट नंबर म्हणत ग्लोबल स्टार अभिनेत्री छाया कदमांचा खास अंदाज! पाहा फोटो

- दमदार अभिनयासाठी अभिनेत्री छाया कदम यांचं नाव घेतलं जातं. अनेक हिंदी मराठी सिनेमातून छाया कदम यांनी त्यांच्या सकस अभिनयाचं दर्शन घडवलं आहे.
- गेल्या काही वर्षांपासून छायाने तिच्या कमालीच्या अभिनयाने स्वतःचं वेगळं पण सिद्ध करत अनेक उत्तम प्रोजेक्ट्ससोबत बॉलिवुड गाजवलं.
- छाया कदम हे नाव साता समुद्रापार पोहचलं खरं, पण भारतात देखील आज हे नाव तेवढ्याच ताकदीने घेतलं जातंय.
- त्यांच्या अभिनयाचं वेगळेपण सगळ्यांना आपसूक मोहून जातंय. छाया ताईंनी आजवर अनेक महत्त्वपूर्ण भूमिका अगदी ताकदीने पार पाडल्या.
- नुकतच त्यांनी त्यांचे काही खास फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. त्यामध्ये त्या अत्यंत मनमोहक दिसत आहेत.
- रेड गाऊनमध्ये त्यांच्या अदा म्हणजे अगदी एज इज़ जस्ट नंबर असंच म्हणावं लागेल.