समय रैना लवकरच बोहल्यावर चढणार? लग्नाच्या चर्चांवर थेट अभिनेत्रीला टॅग करत सोडलं मौन

Samay Raina getting married या चर्चेवर खुद्द समय रैनाने मजेशीर पद्धतीने प्रतिक्रिया देत लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Samay Raina

Samay Raina getting married soon breaks silence on wedding rumors by directly tagging actress Medha Shankar : समय रैना आणि अभिनेत्री मेधा शंकर यांच्या डेटिंगच्या चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहेत. त्यातच आता दोघे डिसेंबर 2026 मध्ये लग्न करणार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली. या चर्चेवर खुद्द समय रैनाने मजेशीर पद्धतीने प्रतिक्रिया देत लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

मुंबईतील कबुतरखान्यांवरून संघर्ष तीव्र, मंगलप्रभात लोढा मुनी निलेशचंद्र महाराजांच्या निशाण्यावर

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये समय आणि मेधा डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचा दावा करण्यात आला होता. समयने ही पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत ‘झूठ बोले कौवा काटे’ हे गाणे लावले. तसेच, “डिसेंबरमध्ये माझा इंडिया टूर आहे, त्यामुळे हे पुढे ढकलावं लागेल,” अशा मिश्कील शब्दांत त्याने प्रतिक्रिया दिली.मेधा शंकरनेही समयची ही पोस्ट शेअर करत हसण्याचे इमोजी वापरले. त्यानंतर तिने आणखी एक पोस्ट शेअर करत लग्नाच्या चर्चा पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट केले.

‘जयंती 2’ला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद, दुसऱ्या आठवड्यात 2 कोटी रुपयांचा व्यवसाय

दरम्यान, समय आणि मेधा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा यापूर्वीही रंगल्या आहेत. जून 2026 मध्ये मुंबईतील ‘आनंदम’च्या प्रीमियरदरम्यान दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर पुन्हा एका ठिकाणी दोघे एकत्र दिसल्याने त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चांना आणखी उधाण आले. मात्र, दोघांनीही आपल्या रिलेशनशिपबाबत अधिकृतपणे कोणतीही पुष्टी केलेली नाही.

राज ठाकरेंबाबत वक्तव्य करणं पडलं महागात, महेश मोटेच्या चेहऱ्याला काळं फासलं, डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा

समय रैनाला ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. 2025 मध्ये शोशी संबंधित वादानंतर त्याला आपले काही व्हिडीओ हटवावे लागले होते. या वादाच्या केंद्रस्थानी रणवीर इलाहाबादियाने बोनस एपिसोडमध्ये केलेली आक्षेपार्ह टिप्पणी होती. त्यानंतर जून २०२६ मध्ये ‘इंडियाज गॉट लेटेंट’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला.

follow us