सोलापूर : ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसमधील (Congress) वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासोबतच्या मतभेदामुळेच थोरात यांनी राजीनामा दिल्याची चर्चा माध्यमांत रंगली आहे. काँग्रेसचे नेतेमंडळीही या वादावर बोलण्यास तयार नाहीत. मात्र, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी थोरात-पटोले वादावर भाष्य केले आहे. काळजी करण्याची काही एक कारण नाही, सगळं काही ठीक होईल’, असे त्यांनी या वादावर म्हटले आहे.
सुशीलकुमार शिंदे हे आज सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांनी विधी मंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे की नुसते पत्र आहे, हे अजून मला माहिती नाही. त्यांच्याशी कोणाशीही बोलणं झाल नाही. मी सोमवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबरोबर पुण्यात होतो, त्यांनाही हे माहिती नाही आहे. असे सांगून काँग्रेस ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी थोरातांच्या राजीनाम्यावर बोलणं टाळलं.
दरम्यान, नाना पटोले आणि बाळासोब थोरात यांच्या वादासंदर्भात ते म्हणाले की, असले हे सर्व वाद टेम्पररी असतात. आता सगळं ठीक होईल. काळजी करण्याचं कारण नाही, असं म्हणतं पक्षातील अंतर्गत धुसफुशीवर जादा बोलणं टाळले.