आमदार संजय शिरसाट यांनी मानहानीकारक वक्तव्य केल्यानंतर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीराज्यातील काही ठिकाणी विरोधात गुन्हा दाखल व्हावा म्हणून प्रयत्न केले. पण त्यांच्याविरोधात कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही. त्यावर अखेर आज सुषमा अंधारे यांनी कोर्टात धाव घेतली आहे.
सुषमा अंधारे यांनी आज पुणे कोर्टात संजय शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. संजय शिरसाट यांच्याविरोधात त्यांनी मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांना आता यासंबंधीचं स्पष्टीकरण कोर्टासमोर द्यावं लागणार आहे.
अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध? शिंदेंनी केला आरोप
आज पुणे कोर्टात जाण्यापूर्वी सुषमा अंधारे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना नक्की किती रुपयांचा दावा करणार हे सांगितलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी १५६-३ नुसार कोर्टात दावा दाखल करणार आहे. क्रिमिनल आणि सिव्हिल या दोन्ही प्रकारे खटले दाखल करत आहे. या केसमध्ये मी ३ रुपयांची अब्रुनुकसानीची मागणी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar)येथे शिवसेना शिंदे गटाच्या (Shivsena Shinde Group)पदाधिकाऱ्यांच्या आयोजित मेळावा आयोजित केला होता. त्यात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat)यांनी आज ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंवर (Sushma Andhare) जोरदार टीका केली आहे. टीका करत असतानाच संजय शिरसाटांची जीभ घसल्याचं पाहायला मिळाले.
सुषमा अंधारेंवर टीका करताना संजय शिरसाट म्हणाले की, ती बाई सर्वांना म्हणते हे माझे भाऊ आहेत. सत्तार माझे भाऊ, भुमरे माझे भाऊ, काय काय लफडे केले तिने काय माहित? अशा प्रकारची खालच्या पातळीवरची टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.
https://letsupp.com/politics/trupti-desai-bjp-cm-on-pankaja-munde-30848.html