अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध? शिंदेंनी केला आरोप
अहमदनगर : शिवसेनेच्या नेत्या तसेच अभिनेत्री दिपाली सय्यद (Deepali Sayyad) यांच्या विषयी एक महत्वाची महिती समोर आली आहे. दिपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. इतकच नव्हे तर दिपाली यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले असल्याचा दावा त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. तसेच दिपाली यांचे पाकिस्तानच्या बँकेत देखील खाते असल्याचा दावा देखील शिंदे यांनी केला आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
अहमदनगर येथे भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान शिंदे यांनी या महत्वाचा खुलासा केला आहे. तसेच पुढे बोलताना शिंदे म्हणाले, अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध आहे. तसेच त्यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व घेतल्याचा आरोप देखील शिंदेंनी केला.
दिपाली यांचे पाकिस्तानामध्ये एक बँक खाते असून यासाठी दाऊद इब्राहिम याची पत्नी मेहजबिन कासकर हिने सय्यद यांना मदत केली असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे. सोफिया सय्यद या नावाने पाकिस्तानी नागरित्व दिले असल्याचा पुरावा भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
दिपाली सय्यद यांच्याबरोबर रामदास आठवले आणि नितीन गडकरी यांचे आर्थिक संबंध आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. यामुळे हे भाजपचे नेते दिपाली सय्यद यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे. दरम्यान याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रार देखील आपण केली आहे.
अशोक चव्हाण भाजपात जाणार? संजय शिरसाटांना भविष्य सांगणाऱ्या पोपटाने सांगितले की काय ?
तसेच या प्रकरणाची पुरावे देऊनही दिपाली सय्यद यांच्यावर कारवाई होत नसल्याचे शिंदे यांनी म्हटलंय. दरम्यान फडणवीसांना पुरावे देऊनही कारवाई झाली नाही तर आगामी काळात देवेंद्र फडवणीस यांना राज्यात फिरू दिले जाणार नाही. तसेच राज्यातील भाजप कार्यालये तोडफोड करून जाळून टाकू, असा इशाराही भाऊसाहेब शिंदे यांनी दिला आहे.